शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.
औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेसोबत (Shiv Sena) बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटानं पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत (BJP) मिळून सरकार देखील स्थापन केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील आमदार शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. दरम्यान, आमदार अंबादास दानवे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या समोर एक गौप्यस्फोट केलाय.
एकनाथ शिंदेंचा मलादेखील फोन आला होता; पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, असं दानवेंनी उत्तर दिलं. आपल्यातील काही आमदार तुम्हाला सांगतील तुमच्यासाठी हे केलं, ते केलं. पण त्यांना सांगा तुला निवडून मी आणलंय. तुला निवडून येण्यासाठी आम्ही काम केलं, असं सांगा, असं आवाहनही आमदार दानवेंनी कार्यकर्त्यांना केलं. कुठल्याही गद्दाराची आठवण येणार नाही, एवढी जनता आपल्यासोबत आहे. कुणाची आठवण येण्याची गरजही नाही, असा टोलादेखील दानवेंनी बंडखोर आमदारांना लगावलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.