एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आनंद दिघेंच्या पुतण्याने केली मोठी मागणी

Anand Dighe nephew Kedar Dighe
Anand Dighe nephew Kedar Digheesakal
Updated on

गेल्या १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला काल अखेर पुर्णविराम मिळाला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुखमंत्री अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. कालच ३० जून रोजीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदेंना मोठी मागणी केली आहे. (Eknath Shinde Chief Minister Anand Dighe nephew Kedar Dighe maharashtra political crisis)

Anand Dighe nephew Kedar Dighe
काळजी करू नका; शरद पवार, ममता बॅनर्जींना टॅग करत संजय राऊतांचं ट्वीट

शपथविधी सोहळ्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगलं काम होवो, ही सदिच्छा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरुन शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ठाकरेंच्या शुभेच्छाला अनुसरूनच आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी विधीमंडळात मंजुर केलेल्या शक्ती विधेयकास राष्ट्रपतींकडुन मान्यता व मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा. अशी मोठी मागणी केली आहे.

Anand Dighe nephew Kedar Dighe
सत्ताच सर्वस्व, बाकी सगळं झूठ; शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

#महाराष्ट्र माजी ऊद्धवसाहेबांनी आपणांस शुभेच्छा दिल्या आहेतच. माझ्याकडुन आपणांस हार्दिक शुभेच्छा…एकनाश शिंदे. देवेंद्र फडणवीस विधीमंडळात मंजुर केलेल्या शक्ती विधेयकास राष्ट्रपतींकडुन मान्यता व मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा.

असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.

Anand Dighe nephew Kedar Dighe
...अन् फडणवीसांनी माध्यमांसमोरच एकनाथ शिंदेंना करून दिली पक्षश्रेष्ठींची आठवण!

केदार दिघे हे ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि शिवसैनिक देखील आहेत. शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर दिघे साहेबांचा आधार घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडू नये अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली होती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.