Latest Marathi News: राज्यातील विधानसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेतून अनपेक्षितपणे बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
सध्या शिवसेनेची वाताहत झाली असून पक्षचिन्हासह अख्खा पक्ष भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर नेहमीच आरोप केले जातात की, मी घरी बसून सरकार चालवलं. मी जे घरी बसून करू शकलो ते तुम्ही सुरत-गुवाहाटीला जावून करू शकले नाहीत.
मुंबईत कालपासून जाणता राजाची कार्यक्रम सुरू केलेत. त्यात एक प्रसंग आहे. तो म्हणजे अफजल खानाच्या स्वारीचा, तो देवळं उध्वस्त करत पुढं निघाला होता. त्याने अनेक गावं बेचिराख केली.
अफजल खानाचा वरवंटा समोर येत असताना महाराजांच्या सैनिकांना फरमान गेली, नाही तर कुटुंबासोबत मारले जाल. काही त्याच्यासोबत गेले. मात्र काहींनी स्वराज्याशी द्रोह करणार नाही. आताही तेच सुरू आहे. एक तर सामील व्हा नाही, आत जाल. म्हणजे भाजपमध्ये जा नाही, तुरुंगात जा, अशी स्थिती, असल्याचं उद्धव म्हणाले.
महाराजांनी अफजल खानाचं काय केलं, ते सर्वांना ठावूक आहे.तीच ताकद आपल्यात आहेत की, नाही हे महाराज बघत आहेत. आपली ताकद आणि परिक्षा मोदी नव्हे तर महाराज बघत आहेत. देशाला दिशा दाखविण्याची वेळ महाराष्ट्रावर आल्याचं उद्धव यांनी म्हटलं.
लोकशाहीचे स्तभं डळमळीत जाले आहेत. आता फक्त सर्वोच्च न्यायालय राहिल आहे. तोच आशेचा किरण आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी ती लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही, असंही उद्धव यांनी म्हटलं.
मी आधीच सांगितलं की, ज्यांना जायचं त्यांनी निघून जा. कोणी सांगितलं म्हणून भूमिका घेणारा मी नाही. कल्याण महापालिकेच्या सभेच्या वेळी एक नाटक केलं होतं. तेव्हा शिवसेना-भाजपचं सरकार होतं. त्या सभेत ह्याच माणसाने नाटक केलं होतं.
भाजप शिवसैनिकांवर अन्याय करत आहे. हे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. तेव्हा भाजप अन्याय करत होतं. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आल्यावर ते अन्याय करतात. मग तुम्हाला हवं तर काय, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.