Eknath Shinde : मी मुलाखत देईन तेव्हा मोठा राजकीय भूकंप होईल, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

आनंद दिघेंबाबत काय राजकारण झालं याचा लवकरच खुलासा करेन, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट
eknath shinde on uddhav thackeray
eknath shinde on uddhav thackeray
Updated on
Summary

आनंद दिघेंबाबत काय राजकारण झालं याचा लवकरच खुलासा करेन, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली आहे. मी मुलाखत देईन तेव्हा मोठा राजकीय भूकंप होईल असे वक्तव्य करत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाण साधला आहे. सत्तेसाठी विश्वासघात कुणी केला? असा सवालही मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना केला आहे. आनंद दिघेंबाबत काय राजकारण झालं याचा लवकरच खुलासा करेन, असंही ते म्हणालेत. (eknath shinde on uddhav thackeray)

आज ते मालेगाव येथे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही गद्दारी केली असती तर राज्यभरातून समर्थन मिळालं नसतं. राज्यातून आम्हाला समर्थन का मिळते याचा विचार तुम्ही करा, असंही त्यांनी ठाकरेंंना सुनावलं आहे. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही, त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली आहे. शिवसेनाला मोठं करण्यासाठी दिवस रात्र एक केली आहे. त्यामुळे बंडाचा शिक्का आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहे. आमची भूमिका कुणाच्याही विरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

eknath shinde on uddhav thackeray
Politics : राज्यापालांनी जनतेची माफी मागावी, त्यांना पदावरून तत्काळ हटवावे - नाना पटोले

पुढे ते म्हणाले की, जनेतेला न्याय देणासाठी महामंडळ स्थापन करणार आहे. दादा भुसे, उदय सामंत यांच्यावर या महामंडळाची जबाबदारी असणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी मैत्री नको ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती मात्र उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी मैत्री करुन मुख्यमंत्री पद मिळवलं आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, मी यासंदर्भात अनेकवेळा उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडली होती. मात्र आमच्याकडे दुर्लक्ष झाले. ठाकरेंनी आमची भूमिका समजून घेतली नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंच्या विचारांवर पुढे जात आहोत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अतिवृष्टीचे पंचनामे १०० टक्के पूर्ण झाले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

eknath shinde on uddhav thackeray
फडणवीस स्वत:साठी वक्तव्य करतात; त्यामुळे राज्यपालांना भूमिका पार पाडावी लागते - आंबेडकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()