Eknath Shide Dasara Melava: 'जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही हं'!

दसऱ्याच्या निमित्तानं आज राज्यातील पक्षीय राजकारणात वेगळ्याच प्रकारचा माहोल दिसून येत आहे.
Eknath Shide Dasara Melava
Eknath Shide Dasara Melavaesakal
Updated on

Eknath Shinde Dasara Melava: दसऱ्याच्या निमित्तानं आज राज्यातील पक्षीय राजकारणात वेगळ्याच प्रकारचा माहोल दिसून येत आहे. यापूर्वी जे कधीही झालं नाही ते विजयादशमीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना पाहायला मिळणार आहे. मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांची बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या सभेला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असताना त्या सभांमधील वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मोठं प्लॅनिंग केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते यावेत यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एसटीची सोय केलेली आहे. याशिवाय जे कार्यकर्ते पदाधिकारी सभेला येणार आहेत त्यांच्यासाठी मोठी सरबराई करण्यात शिंदे प्रशासन व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेनी आपल्या सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नाश्त्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे.

यावेळी शिंदेच्या गटाकडून लांबून आलेल्या कार्यकर्त्यांना सभा झाल्यावर जेवून जाण्याचे आवाहन केले आहे. यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट भलत्याच गंमतीशीर आहेत. BKC मैदानावर विशेष किचन बनवण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि इतर यांच्या जेवणासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. BKC मैदानाच्या मागच्या बाजूला या छोटेखानी हायटेक किचनची व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या पाहुण्यांसाठी नाष्टा आणि जेवणाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Eknath Shide Dasara Melava
Eknath Shinde Dasara Melava : बीकेसी मैदानावर कार्यकर्त्यांसाठी अशी करण्यात आली जेवणाची व्यवस्था

किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुजराथी प्रकारचा ठेपला रॅप, सँडविच, दोन ते तीन प्रकारचे चाट असणार आहेत. यामध्ये भारतीय पद्धतीचे काही प्रकार ठेवण्यात आले आहेत. ज्यूस आणि फळ यांचीही सोय करण्यात आली आहे. हा दसरा मेळावा हा प्रतिष्ठेचा ठरणार आहे. अवघ्या राज्याचं लक्ष्य संध्याकाळी होणाऱ्या दसरा मेळाव्यावर लागून राहिलं आहे.

Eknath Shide Dasara Melava
Eknath Shinde Melava: CM शिंदेचा ठाकरेंच्या प्रत्येक मुद्यावर पलटवार; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.