मुंबई : राज्यात परतीच्या पावसानं मोठा धुमाकूळ घातला. यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यापार्श्वभूमीवर त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असा पुनरुच्चार विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच याबाबत आपण दिवाळीपूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांची भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. (Eknath Shinde Devendra Fadnavis promised to doing Panchnama damaged crops says Ajit Pawar)
राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी करत असताना झालेलं दुःख म्हणजे अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान. कारण खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला. शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत. काहीजण दुर्देवानं आत्महत्येपर्यंत मजल मारताहेत. शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांना भेटून निवदेन दिलं होतं.तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याचं त्यांना आवाहन केलं होतं. त्यावेळी दोघांनी मला तातडीने पंचनामे आणि मदत करतायला सांगतो, असं सांगितलं होतं. पण तसं काही घडलेलं नाही, असं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.
आता जे काही नुकसान झालंय यात मदत करा, नाहीतर काही खरं नाही. कारण आत्ताचं रब्बीचं पिक गेलं सुरुवातीचं खरिपाचंही गेलं. यामध्ये शेतकरी भरडला जातोय. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असल्यानं ते दिवाळी साजरीच करु शकलेले नाहीत, अशी वस्तुस्थितीही यावेळी पवारांनी मांडली.
राष्ट्रवादीचं मंथन शिबिर
राष्ट्रवादी काँग्रेसनं चार आणि पाच नोव्हेंबरला शिर्डी इथं 'राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा' या अभ्यास शिबिराचं आयोजनं केलं आहे. या मागचं कारण म्हणजे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये वर्तमानाच्या परिस्थितीचं आकलनं वाढावं. भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी या सहकाऱ्यांनी सज्ज रहावं तसंच राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी रहावी. यामध्ये १,७५० कार्यकर्ते महाराष्ट्रातून येणार आहेत. यामध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही यावेळी अजित पवारांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.