Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी सांगितलं 'लोकसभा २०२४'चं गणित ; महायुतीला किती जागा मिळणार?

Eknath Shinde
Eknath Shinde
Updated on

Eknath Shinde :  निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे असा वाद रंगला आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड येथील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आक्रमक टीका केली. या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी लोकसभा २०२४ चं गणित सांगितलं आहे. 

एकनाथ शिंदे म्हणाले, "आमचं काम पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरलेली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीच्या एका विजयाने ते एवढे हुरळून गेले आहेत की त्यांना वाटतं की आता राज्य आणि देशामध्ये बदल घडेल. पण त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला हे त्यांना दिसत नाही.

"यापूर्वी देखील बदलाचे वारे वाहून गेले असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र २०१९ मध्ये देखील साडेतीनशे पेक्षा जास्तीच्या जागा मोदींच्या नेतृत्वात जिंकल्या. आताही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० पेक्षा जास्त जागा महायुतीला विजय मिळतील आणि सर्व विरोधकांचा धुव्वा उडेल”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

Eknath Shinde
उस तोडला, गटारं उपसली, लोकांनी हाकललं पण आज अनेक 'अनाथांचा नाथ'

उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ”

अनिल देशमुख आणी नवाब मलिक यांनी त्यांनी देशभक्ताची उपमा देऊ नये. हे करायला देखील ते मागेपुढे पाहणार नाहीत. आमच्या सरकारचा विकास पाहून त्यांना पोटदुखी झाली आहे. या इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे रूग्णालयात ठेवला आहे, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. 

Eknath Shinde
Sanjay Raut : हक्कभंग नोटिशीला राऊतांकडून अजून उत्तर नाही; आता पुढे काय होणार?

"ठाकरेंच्या सभेत राष्ट्रवादीने त्यांचे लोक पाठवले. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुळ शिवसैनिक उरला नाही. राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची सेना गिळंकृत करेल आणि तेव्हा त्याचे डोळे उघडतील" असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Pune Politics : कसबा पोटनिवडणूक झाल्यानंतर भाजप- काँग्रेस पहिल्यांदाच समोरासमोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.