MLC Election: शिंदे गटाचा भाजपला पहिला मोठा धक्का; अमरावतीच्या जागेवर भाजपचा धक्कदायक पराभव

पराभवानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया
MLC Election
MLC Electionesakal
Updated on

राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात मोठी उलथापाटथ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत नवा गट तसार करत भाजपसोबत नवा संसार मांडला. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा येईल म्हणणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

शिंदे-फडणवीस यांच्या यांच्या नव्या खेळीने मविआ सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं. खरं सत्तांतर झालं मात्र शिंदे गटातील आमदारांची धूसफूस वारंवार चव्हाट्यावर आली आहे.

MLC Election
BMC Budget 2023 : मुंबईकरांसाठी महत्त्वाचा दिवस; आज सादर होणार महापालिकेचा अर्थसंकल्प

कधी मंत्री पद दिलं नाही म्हणून तर कधी मान पान मिळत नाही म्हणून आमदारांमधील धुसफुस समोर येत असते.दरम्यान आता हीच धुसफुस समोर आली विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकी मुळं.

या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला नागपूरसह अन्य तिन जागा हातातून निसटल्या. या निवणुकीत चुरशीची लढत झाली ती,अमरावतीच्या जागेवर भाजपचे आमदार रणजित पाटील यांचा लाजिरवाणा पराभव झाला.

MLC Election
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

पराभवानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, या निवडणुकीत आमच्या पक्षाचे दोन आमदार असून देखील आम्हाला आणि आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं गेलं नाही, असा आरोप संजय गायकवाड यांनी भाजपवर केला आहे.

शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळे भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचे दोन आमदार, एक खासदार आहेत. आम्हाला कोणाला ही विश्वासात घेतलं गेलं नाही.

आमच्याकडे एवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. पण त्यांनासुद्धा विश्वासात घेतलं गेलं नाही, निवडणुक मतदार यादी मागितली तरी देखील आम्हाला देण्यात आली नाही" असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.