Eknath Shinde : 2014 मध्येच एकनाथ शिंदे झाले होते नॉट रिचेबल; 'योद्धा कर्मयोगी..' पुस्तकातून गौप्यस्फोट

Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on

मुंबईः पूर्वाश्रमीचे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक माहिती पुढे येत आहे. मूळच्या शिवसेनेत असतांना २०१४ मध्येच एकनाथ शिंदे हे पक्षावर नाराज झाले होते. ते नॉट रिचेबलही झालेले. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यावेळी त्यांची समजून काढली होती. एका पुस्तकातून हा दावा करण्यात आलेला आहे.

लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांच्या 'योद्धा कर्मयोगी, एकनाथ संभाजी शिंदे' या पुस्तकातून हा दावा करण्यात आलेला आहे. हे पुस्तक येत्या १८ एप्रिल रोजी प्रकाशित होणार आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Eknath Shinde
Pankaja Munde : वैद्यनाथ कारखान्यावर छापा पडल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या स्व. गोपीनाथ मुंडेंना...

मागील दोन-तीन दिवसांपासून दोन घटनांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक अंजली दमानिया यांनी अजित पवारांसंदर्भात केलेलं विधान आणि दुसरं आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेलं विधान. आदित्य यांनी एका मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे 'मातोश्री'वर येऊन रडल्याचा दावा केला आहे. भाजपशी हातमिळवणी करा अन्यथा आम्हांला तुरुंगात टाकतील, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रडले होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Eknath Shinde
Devendra Fadnavis : आम्हांला अजून 'त्या' मतदारसंघांपर्यंत पोहोचायचं आहे; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

आता तर २०१४ मध्ये एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याचं सांगण्यात येत आहे. प्रा. ढवळ यांच्या पुस्तकात सांगण्यात आलंय की, २०१४ मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेची युती तुटली तेव्हाच एकनाथ शिंदेंना ते पटले नव्हते. त्यामुळे ते नॉटरिचेबल झालेले आणि माझ्या गावी आले आणि तिथेच राहिले. असं प्रा.ढवळ सांगतात.

त्यांनी पुढे सांगितलं की, शिंदेंच्या चेहऱ्याव प्रचंड अस्वस्थता होती. मात्र रात्री उद्धव ठाकरे यांचा एक फोन आला आणि शिंदेंनी संयम पाळला, नसता तेव्हाच बंड झालं असतं असं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाला शरद पवार हे उपस्थित राहू शकतात, असं ढवळ यांनी सांगितलं. येत्या १८ तारखेला या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.