Eknath Shinde: 'मी बदला घेणार' उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर एकनाथ शिंदेंचं खरमरीत प्रत्युत्तर

Eknath Shinde harsh reply to Uddhav Thackeray criticism
Eknath Shinde harsh reply to Uddhav Thackeray criticismesakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहिला मिळत आहे. एकमेकांवर जाहीर कार्यक्रमात, माध्यमांशी बोलताना टीका टिप्पणी करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या अशाच टीकेला आता मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रथमच ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे…

या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचाय … गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचाय …. स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही."

Eknath Shinde harsh reply to Uddhav Thackeray criticism
Long March Update : मोठी बातमी! अकोले ते लोणी दरम्यानचा शेतकऱ्यांचा लॉगमार्च अखेर मागे

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

भारतीय कामगार सेनेची ५५ वार्षिक सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. एअर कंडिशनरमध्ये बसून कॅबिनेट मिटिंग घ्यायच्या आणि कायदे बदलायचे त्यांना काही माहिती नसतं. आपण मोर्चे काढले, पण हिसका दाखवला पाहिजेच.

मला आठवतंय तुम्ही जे कायदे म्हणतायत, त्यांची अटलजींच्या काळात चर्चा होती. तेव्हा अटलजी म्हणायचे 'की बाळासाहेब से मिलो और बात करो'. 60 टक्के कामगार संघटित आहे, याचा विचार व्हायला हवा. आपलं सरकार असताना किती उद्योग आलेले आणि आता यांच्यावेळी किती गेले.

उद्योग धंदे गेले तरी यांचे शेपट्या आतमध्ये आहेत. मी आता येताना ट्विट बघितले बुटाची कंपनी महाराष्ट्रात येणार असं म्हटलं तीही कंपनी तामिळनाडूला गेली, बसा तुम्ही जोडे पुसत. सरकार पाडलं त्याचा मी बदला घेणार म्हणजे घेणारच

Eknath Shinde harsh reply to Uddhav Thackeray criticism
Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार; काढणार मोठी यात्रा, जाणून घ्या...

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी या अगोदर देखील ट्विट करत ठाकरेंवर बाण सोडला होता. त्यांनी ट्विट केलं होतं की, "काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही.

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात."

शिंदे पुढे म्हणाले, "जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात.

चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.