धमकी पत्रानंतरही एकनाथ शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर जाणार

eknath shinde
eknath shindeeknath shinde
Updated on

नागपूर : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यापासून अनेक नक्षल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यामुळे गडचिरोली आणि राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलवादी त्यांच्यावर चिडलेले आहेत. जिल्ह्यात विकासकामे करू नका, तुमच्या कामांमुळे आम्हाला मिळणाऱ्या पैशाचा ओघ थांबला आहे. विकासकामे करू नका, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ, अशी धमकी नक्षल्यांनी पत्रातून दिल्याचे सूत्र सांगतात.

तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून आमचे अनेक साथीदार शहीद झाले. त्याचा बदला आम्ही घेणार, असेही पत्रात नमूद असल्याची माहिती आहे. आमचे साथी गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर सर्व शहरांमध्ये आहे. तुमच्या आसपास ते फिरत आहेत, याची जाणीव तुम्हाला नाही. नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याची जी भाषा तुम्ही करता, ते शक्य नाही. कारण, देशातील अनेक राज्यांत आम्ही आहोत. तुम्हीच काय कुणीही आम्हाला संपवू शकत नाही, असे पत्रात नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे.

eknath shinde
बबिताचा जोडीदार बघितला का? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे कुणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही. उद्या पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. नक्षल्यांसह जिल्ह्यातील मागासलेल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. त्यामध्ये कुणीही आडकाठी आणू शकत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी धमकीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर दिली.

धमकीचे पत्र शिंदेंच्या घरी

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या जिल्ह्यात सुरजागडच्या खाणकामाला नक्षल्यांचा विरोध आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वी जाळपोळही केली आहे. आता तर त्यांनी पालकमंत्री शिंदे आणि कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. धमकीचे पत्र एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.