Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्रीपद मिळालं नाही; शिंदे गटात वाढतेय नाराजी

cm eknath shinde
cm eknath shinde esakal
Updated on

मुंबई - शिंदे गटात नाराजी वाढू लागली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी पक्षाला मंत्रीपदे मिळाली आहेत. मात्र शिंदे गटाला एकही मंत्रिपद नाही. गटाचे पदाधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत चालली असून त्यामुळे हा गट एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.

cm eknath shinde
Cold War : अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून CMसह भाजप आमदार अस्वस्थ; देशमुखांचा दावा

कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे दिले होते. शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या नवनिर्वचित पदाच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली.

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाग क्रमांक दोनमध्ये विभागप्रमुख हा मराठी चेहरा असावा अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या प्रकरणी दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

cm eknath shinde
BREAKING : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर

कांदिवली पूर्व, मालाड, चारकोप येथील पदाधिकाऱ्यांमध्ये पक्षांतर्गत असंतोष निर्माण झाला असून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी पक्षाला मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र शिंदे गटाला एकही मंत्रिपद नाही. त्यामुळेही शिंदे गटात नाराजी असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.