मुंबई : शिवसेनेतून बंड करुन भाजपसोबत सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बंडाशी केली आहे. पण यातही एकनाथ शिंदेंचं बंड हे मेरिटवरचं प्रकरण असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. पवारांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी हे भाष्य केलं आहे. (Eknath Shinde rebellion compared to Sharad Pawar Pulod govt Fadnavis claims that Shinde matter of merit)
फडणवीस म्हणाले, "एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असताना तिथून ५० लोकांसह बाहेर पडत त्यांनी आमच्यासोबत सरकार स्थापन केलं. मग पवार साहेबांनी तयार केलेलं पुलोदचं सरकार म्हणजे मुसद्देगिरी आणि शिंदेंनी तयार केलेलं सरकार हे बेईमानी कशी होऊ शकते?"
"मी कुठेही पवार साहेबांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. उलट मीच सांगितलं की, ते भाजपसोबत आले. माझ्या या प्रश्नाचं उत्तर कोणी का देत नाही की, पवारांनी जर कुठली गोष्ट केली असेल तर ती मुसद्देगिरी ठरते आणि तेच जर तुम्ही एकनाथ शिंदेंनी केलं तर बेईमानी कशी? शिंदेंची केस बघितली तर ती मेरिटची केस आहे. कारण एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत युतीत निवडून आले. शरद पवार तर काँग्रेससोबत निवडून आले होते त्यानंतर ते भाजपसोबत म्हणजेच त्यावेळच्या जनसंघासोबत गेले होते" (Latest Marathi News)
त्यामुळं माझं म्हणणं एवढचं आहे की, मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, यामुळं इतिहास बदलत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की, शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं ते बाहेर पडले आणि भाजपसोबत अर्थात तेव्हाच्या जनसंघासोबत त्यांनी सरकार तयार केलं, तेच मी सांगितलं आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.