Eknath Shinde : तुमच्यासोबत किती भाऊ आहेत? मुख्यमंत्री शिंदे;उद्धव ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर

आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना त्यांनी आणावी, या ठाकरे यांच्या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना त्यांनी आणावी, या ठाकरे यांच्या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की आम्ही लेक लाडाची योजना आणलीच. लाडकी बहीण-लाडका भाऊ योजनाही आणू.

पण हे बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत, त्यांनी विचार करावा, आत्मपरीक्षण करावे. सगळे भाऊ का गेले, असे खोचक व जिव्हारी लागणारे प्रत्युत्तर ठाकरे यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले, की ठाकरे यांचे सरकार आजारी सरकार होते. आता कामाच्या जिवावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून जिंकणार आहोत.

तुम्ही किती विकास केला, किती बाहेर फिरला, हे सारे राज्याला माहीत आहे. लाडकी बहिण या योजनेवरून शिंदे यांनी ठाकरे यांना सुनावताना आपले किती भाऊ सोबत आहेत, याचा विचारही आपण करावा असाही सल्ला शिंदे यांनी ठाकरे यांना दिला.

शिंदे म्हणाले...

  • पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी

  • कामाच्या जिवावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार

  • ठाकरेंच्या डोक्यात लिंबू-मिरच्यांचे विचार असतात

  • त्यांचे भाऊही त्यांच्यासोबत नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.