खेडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या गोळीबार मैदानावर उत्तरसभा घेतली. याच मैदानावर उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर आसूड ओढला होता. त्याला आज शिंदेंनी उत्तर दिलं.
मी फक्त उत्तर द्यायला नाही आलो तर कोकणासाठी भरभरुन निधी घेऊन आलोय, असं म्हणून एकनाथ शिंदे यांनी कोकणासाठीच्या निधीचा पाढा वाचला. तसेच आपण योगेश कदम यांच्यामागे मुख्यमंत्री म्हणून खंबीरपणे उभा राहणार असल्याचा शब्द दिला.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, २०१९च्या निवडणुकीच्या धामधुमीत माझी आई आजारी होती. आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मी राजेंद्र गावित यांच्या प्रचाराला निघालो होतो. तेवढ्यात मला डॉक्टरांचा फोन आला. मी गावितांना तसं सांगितलं. परंतु गावितांनी सगळी तयारी झाल्याचं सांगून कार्यकर्ते वाट बघत असल्याचं सांगितलं.
हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आला होता. आई जवळपास गेलीच होती. तरीही मी डॉक्टरांना संध्याकाळी येतो असं सांगितलं आणि प्रचाराला गेलो. पक्षासाठी आम्ही असं काम केलं, तो गुन्हा आहे का? तरीही तुम्ही गद्दार म्हणता? असं म्हणून त्यांना भावनेला वाट मोकळी करुन दिली.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, आम्ही कोरोना काळात घरात बसून राहिलो नाहीत. पीपीई किटमध्ये रुग्णालयात जावून काय हवं-नको ते बघितलं. ऑक्सिजन टँकरसाठी रात्री-अपरात्री झटलोत. त्यामुळे एकदा चारशे रुग्णांचा जीव वाचल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आईची आठवण काढून भावूक झाले. आईचं सगळं माहिती असतांनाही आपण राजेंद्र गावित यांच्या प्रचाराला गेल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच त्यांनी कोकणासाठी विविध विकासयोजनांची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी शरसंधाण साधलं.
गुलाबराव पाटील, रामदास कदम यांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांना बोलू दिलं जात नव्हतं. परंतु कार्यकर्ते मोठे झाले तर पक्ष आणि नेता मोठा होत असतो, हे त्यांना कळलं नाही असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी काढला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.