Shivsena News: शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? आणखी एक नेता...

हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं आहे.
Shivsena News
Shivsena News
Updated on

हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं आहे. शिंदे गटातील अनेक मंत्र्यांच्या घोटळ्याचा दाखला देताना दिसत आहेत. अशातच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Eknath Shinde Shambhuraj Desai illegal construction Mahabaleshwar maharashtra politics )

कृषीमंत्री अब्दुल सत्तार तसेच संजय राठोड या दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गायरान जमिनी घोटाळ्याप्रकरणी दोघेही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, शंभुराजे देसाई वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

काय आहेत शंभुराजे देसाईंवर आरोप?

महाबळेश्वर येथील नावली येथे अवैध बांधकाम केल आहे. निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे. परंतु प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम करण्यात आलं आहे.

सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. सदर जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने बांधकामास परवानगी नव्हती. परवानग्या न घेता घराचं अवैध बांधकाम केलं आहे. अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांचे पद रद्द होण्यास पात्र आहे. सदर जमीन ही शंभूराज देसाईंच्या नावावर आहे.

Shivsena News
Winter Session: मुख्यमंत्र्यांसह शिंदे गट विरोधकांकडून टार्गेट? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

सत्तारांपाठोपाठ अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडदेखील मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राठोड हे मविआ सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी २९ जुलै २०१९ रोजी गायरानाची पाच एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते, अशी बाब आता समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.