Hingoli Lok Sabha 2024: हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची शिंदे गटावर नामुष्की, नेमकं काय घडलं? कुणाला मिळालं तिकीट?

Hingoli Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने हिंगोलीती उमेदवार बदलला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
Sabha
Hingoli Lok Sabha 2024esakal
Updated on

Hingoli Lok Sabha 2024

लोकसभा निवडणुकीच्या हिंगोलीचा जाहीर उमेदवार बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर (शिंदे गट) आली आहे. हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांच्या नावाला स्थानिक विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली होती. या यादीमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र भाजपचा दबाव होता. त्यामुळे हिंगोलीचा जाहीर उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अधिकृत कोणतीही घोषणा न करता एकनाथ शिंदेंची शिवसेना एबी फॉर्म देण्याचं काम करत आहे. हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजने केलेल्या सर्व्हेनुसार हेमंट पाटील यांच्या नावाला विरोध होता. भाजप देखील उमेदवार बदलण्यासाठी आग्रही होते.

Sabha
NCP Party Symbol: कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केल्यास गंभीर विचार करू ; सुप्रीम कोर्टाने टोचले अजित पवार गटाचे कान

हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते काल आक्रमक झाले होते. वर्षा निवासस्थानी त्यांनी मोर्चा देखील काढला होता. रस्सा रोको देखील करण्यात आला. मात्र तरी देखील आज शिंदे गटाने हेमंत पाटील यांचे तिकीट रद्द केले आहे.

बाबुराव कमद म्हणाले, चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मुंबईला बोलावले होते. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरु करा, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. हेमंत पाटील यांच्याशी माझं बोलण झालं आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.

मात्र यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याची आली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोण आहेत बाबुराव कदम कोहळीकर-

बाबुराव कदम कोहळीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघात त्यांचं मोठं नाव आहे. निवघा जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांनी आपल्या राजकीय जिवनाला सुरुवात केली. सलग २५ वर्षे त्यांनी जिल्हा परीषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. २००८ मध्ये त्यांनी विधानसभा लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये पक्षाने तिकीट न दिल्याने ते अपक्ष लढले होते. २ क्रमांकाची मते त्यांना मिळाली होती.

Sabha
Smriti Irani: "...तर ते सहनही करणार नाही अन् माफही करणार नाही," स्मृती इराणींनी का दिला राहुल यांना इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.