Latest Maharashtra News: लोकसभा निवडणूक नॅरेटिव्हमुळे हातून गेली; पण आता विधानसभेची गणिते वेगळी असल्याने चार महिन्यांपूर्वी पराभूत झालेल्या माजी खासदारांनी पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचा विचार शिवसेना शिंदे गटाने गंभीरपणे घेतला आहे.
राजकीय पक्ष लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांना विधानसभेच्या फडात उतरवायची तयारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी सुरू ठेवली असताना शिंदे गटात तसे स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे समजते. स्ट्राइक रेट वाढवण्याच्या प्रयत्नात या पराभूत उमेदवारांचा निवडणूक प्रवेश महत्त्वाचा मानला जातो आहे.