विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर विजयी

Rahul Narwekar
Rahul Narwekaresakal
Updated on

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले.(shivsena bjp s rahul narvekar won the assembly speaker election maharashtra politics)

विधी मंडळातील पहिली लढाई शिंदे सरकारनं जिंकली. १६४ मत मिळवत राहुल नार्वेकराची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाने राहुल नार्वेकरांना पाठिंबा दिला. बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला. राजन साळवी यांचा १०७ मतांनी पराभव झाला.

Rahul Narwekar
PHOTOS | रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर बनले विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड. निवड होता भाजपकडून जय श्री रामाची घोषणा. तर बंडखोर आमदारांकडून जय भवानी, जय शिवाजी..भारत माता की जय..अशा घोषणा देण्यात आल्या.

Rahul Narwekar
देशानं या घटनेची नोंद घेतली; बंडावर मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले!

सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जात आहे.

Rahul Narwekar
शिंदे गट विधानभवनात पोहोचण्याआधीच कार्यालयाचे 'दार' केले बंद!

राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि गिरीश महाजनांनी अनुमोदन दिलं. तर राजन साळवींचा प्रस्ताव चेतन तुपेंनी मांडला, तर संग्राम थोपटेंनी अनुमोदन दिलं होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.