Eknath Shinde: मोठी बातमी! अजित पवारांशिवाय लढण्यासाठी शिंदेंचा प्लॅन रेडी? राष्ट्रवादीकडे असलेल्या 'या' आठ मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमले

Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्याबद्दल पुन्हा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on

Shiv Sena News: मागच्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या महायुतीमधील सहभागावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अजित पवार शरद पवारांकडे माघारी जातील, असं कधी बोललं जातं.. तर कधी अजित पवार तिसरी आघाडी काढणार, असंही बोललं जातं.

दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम धुसफूस सुरु असते. लोकसभा निवडणुकीतील पराभवावरुन अजित पवारांना जबाबदार धरल्याच्या बातम्या आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी वेगळा निर्णय घेण्यासंदर्भात विधान केलं होतं.

त्यातच आता एक मोठी घडामोड घडली असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्याबद्दल पुन्हा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.

Eknath Shinde
CM Shinde Decision: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! वेळेपूर्वीच खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; पत्रकार परिषदेत माहिती

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेकडून निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. या मतदारसंघांमध्ये निफाड, दिंडोरी, जुन्नर, खेड आळंदी, शहापूर, अणुशक्तीनगर, देवळाली, वसमत या मतदारसंघांचा समावेश आहेत.

या आमदारांच्या मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक

१. निफाड - दिलीप बनकर

२. ⁠दिंडोरी - नरहरी झिरवाळ

३. ⁠जुन्नर - अतुल बेनके

४. ⁠खेड आळंदी - दिलीप मोहिते

५. ⁠शहापूर - दौलत दरोडा

६. ⁠अणुशक्तीनगर - नवाब मलिक

७. ⁠देवळाली - सरोज अहीरे

८. ⁠वसमत - चंद्रकांत नवघरे

Eknath Shinde
Bacchu Kadu : भाजप-काँग्रेसमध्ये धमक असेल तर 'यांच्या' कमी कराव्यात; बच्चू कडूंचं थेट आव्हान

या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र भाजपाकडे असलेल्या एकाही मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा अजित पवारांशिवाय लढण्याचा प्लॅन रेडी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.