तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही; एकनाथ शिंदेंचा रोख कुणाकडे ?

Eknath Shinde
Eknath Shinde
Updated on

मुंबई - विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला होता. त्याबरोबरच आता त्यांनी बहुमताची कसोटीही पार केली आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकत आपलं सरकार कायम ठेवलं आहे. विश्वास ठराव संमत झाल्यानंतर अभिनंदन ठरावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी सुमारे तासभर केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. (Eknath Shinde speech in Vidhansabha)

Eknath Shinde
आमचं बंड नव्हे, 'उठाव'; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना इशारा

एकनाथ शिंदे आज विधानसभेत आक्रमक दिसले. आपली बंडामागची भूमिका मांडत असताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. माझ्या कुटुंबाला प्राधान्य न देता मी कायम संघटनेसाठी झटत राहिलो. काही वेळा मी खचलोही, पण मला दिघेंनी आधार दिला, असंही शिंदेंनी सांगितलं.(MaharashtraVidhanSabhaFloorTest)

मी बाळासाहेबांच्या विचाराने वेडा झालो होतो. आनंद दिघेंनी मला शाखाप्रमुख केलं, असंही ते पुढे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे आणि आईमधल्या संभाषणाची आठवणही करुन दिली. यावेळी त्यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेत घडलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला. अनेक आमदार यायचे आणि म्हणायचे आपली नैसर्गिक युती भाजपासोबत आहे. यानंतर मी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. याला दीपक केसरकर साक्षीदार आहेत. मात्र, याचा परिणाम झाला नाही, अस शिंदे म्हणाले.

दरम्यान आम्ही निर्णय घेतल्यानंतर आमच्यावर टीका झाली. रिक्षावाला, टपरीवाला असं म्हणून हिणवलं. सामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो. असं म्हणत आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या ठाकरे कुटुंबाला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.