शिंदेंचा मविआला थेट इशारा, आमदार कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी...

आमदारांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे - एकनाथ शिंदे
Eknath Shinde latest political News
Eknath Shinde latest political News
Updated on

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींचा वेग वाढलाय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत सरकारला इशारा दिलायं. (Maharashtra Politics) राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आलेत. आमदारांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं वक्तव्या आणि अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. (Eknath Shinde latest political News)

Eknath Shinde latest political News
Gujrat Riots: मोदींनी भगवान शंकराप्रमाणे विषप्राशन केलं - अमित शाह

मागील काही दिवासांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलचं तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याभोवती फिरणारे हे सत्तानाट्य दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. यादरम्यान, आता शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिल्याने हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अनेक उलट सुलट चर्चांनाही उधाण आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळेसे पाटील यांनी बंडखोर आमदारांचे संरक्षण काढून घेतले आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं वक्तव्य करत शिंदे यांनी थेट इशारा दिला आहे. त्यामुळं आता शिवसेना यावर काय उत्तर देणार हे पहावं लागणार आहे.

Eknath Shinde latest political News
Live मुलाखतीतच अमित शाह म्हणाले, "..हा बोलण्याचा विषय नाही"

एकनाथ शिंदे यांनी एक पत्र लिहंल आहे. यात ते म्हणतात की, राजकीय आकसापोटी शिवसेनेतील एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची सुरक्षाव्यवस्था काढली आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. आमदारांच्या कुटुंबियांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. आमदारांना काही झालं तर मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार राहतील असंही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी ३८ आमदारांच्या सहीचं पत्र मुख्यंत्री आणि गृहमंत्री यांना लिहंल आहे.

शिवसेनेचे 22 आमदार मुंबईहून सुरतला जात आहेत आणि गृहराज्यमंत्री दिलीप वळसे यांना हे कसे कळले नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे. विशेषत: मंत्र्यांसह आमदार एवढ्या मोठ्या संख्येने फिरत असताना राज्याचा गुप्तचर विभाग सरकारला का सावध करू शकला नाही, याचेही आश्चर्य वाटते, असंही ते म्हणाले आहेत.

Eknath Shinde latest political News
शिवसेना आमच्या रक्तानं बनलेली पार्टी, पैशानं विकत घेणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.