Narayan Rane: "एकनाथ शिंदे पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नाही"; नारायण राणेंचं विधान चर्चेत

उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर निशाणा साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
Narayan Rane: "एकनाथ शिंदे पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नाही"; नारायण राणेंचं विधान चर्चेत
Updated on

मुंबई : उद्धव ठाकरेंसह त्यांच्या शिवसेनेवर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आहे. "एकनाथ शिंदे पाकिटं पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नाही," या त्यांच्या विधानानं खळबळ उडाली आहे. (Eknath Shinde was among deliverers on Matoshri not takers Narayan Rane statement)

Narayan Rane: "एकनाथ शिंदे पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नाही"; नारायण राणेंचं विधान चर्चेत
Manoj Jarange: 'लायकी'चं विधान आलं अंगलट! जरांगेंनी मागे घेतला शब्द

आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा

आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकण दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना भेटी दिल्या. इथं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घरी आंगण बैठका घेतल्या. यानंतर त्यांच्यावर पलटवार करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला. (Marathi Tajya Batmya)

Narayan Rane: "एकनाथ शिंदे पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नाही"; नारायण राणेंचं विधान चर्चेत
Aditya Thackeray: आदित्य ठाकरे बैठकांमध्ये दिसणार नाहीत, तर तुरुंगात...; राणेंचा पुन्हा निशाणा

राणेंचा ठाकरेंवर जहरी टीका

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांवर वारंवार खोक्यांचा आरोप केला जात आहे. शिवसेनेतून फुटण्यासाठी प्रत्येकाला ५० खोके अर्थात ५० कोटी रुपये मिळाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून सुरुवातीपासून अद्यापर्यंत केला जात आहे. यावरच भाष्य करताना ऐकेकाळी शिवसेनेत असलेले नारायण राणे यांनी ठाकरेंकडून पाकिटातून पैशांच्या देवाण-घेवाण होत असल्याचं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

Narayan Rane: "एकनाथ शिंदे पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नाही"; नारायण राणेंचं विधान चर्चेत
Modi on KCR: केसीआर यांना एनडीएत घेतलं नाही कारण....; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

पाकिटं कसे जायचे?

हे आरोप करताना राणे म्हणाले, "ज्यांनी पाकिटांची डिलिव्हरी केली त्यांनी शिंदेंवर बोलू नये. त्यावेळचे कुठे गेले खोके, कसे जात होते ते? वेळ कुठली असायची, कुणाच्या हातात दिले, कुठल्या माळ्यावर जायचे? मला सगळं माहिती आहे. पण त्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे रहायचे म्हणून मला त्यावर अधिक काही बोलायचं नाही.

एकनाथ शिंदे पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळं ठाकरेंनी खोके खोके बोलायचं सोडा निवडणुकीत तुमचं काहीही होणार नाही," अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.