Eknath Shinde : मी दोन-दोन पेन ठेवणारा मुख्यमंत्री; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका

Eknath Shinde
Eknath ShindeEsakal
Updated on

मुंबईः मुंबईमध्ये आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापनदिन संपन्न झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार आसूड ओढला. उद्धव ठाकरेंपेक्षा मी किती कार्यक्षम आहे, हे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता. माझ्याकडे दोन-दोन पेन आहेत. मी कुठेही सह्या करतो. गाडीत, कार्यालयात, ठाण्यात.. काम अडू नये आणि गोरगरीबांना मदत व्हावी, यासाठी हे सरकार काम करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Eknath Shinde: शिवसेनेसाठी झटलो अन्...! आईच्या आठवणीनं CM शिंदे भावूक

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, मागच्या सरकाने काही केलं नाही. आमच्या सरकारने ७५ हजार कोटी रुपयांची कामे केली आहेत. याच रीक्षाने तुमच्या मर्सिडिजला खड्ड्यात घातलं आहे. आम्ही काम करत राहू, तुम्ही आरोप करीत राहा. हिंदुत्वाची ओळख आज पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु असला तरी आमची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना लोकांच्या हितासाठी वाट्टेल ते करेल.

'वर्षा'तून जातांना मोठमोठ्या बॅगा सोबत नेल्या- शिंदे

"मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार होताना उद्धव ठाकरेंनी काय नाय ते सगळं केलं. वर्षावरुन खाली जाताना आम्हाला घरातून बाहेर काढलं, आमच्यावर अन्याय झाला असं ते सांगत होते. यावेळी त्यांच्या गळ्यावर पट्टा होता. मोठ्या मोठ्या बॅगा वर्षाबाहेर चालल्या होत्या. काही लोकांना या बॅगा घ्यायला सांगितलं.

Eknath Shinde
Shivsena vardhapan din 2023 : फडणवीस म्हणजे, हास्यजत्रेचा प्रयोग! मोदींनी लस तयार केल्याच्या दाव्याची ठाकरेंनी उवडली खिल्ली

काही लोकांना रडायला लावलं होतं, पण सत्ता येते जाते एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण दुसऱ्या दिवशी गळ्यातला पट्टा गायब! सगळं गायब, तरातरा माणूस चालायला लागला. ही कोणाची करामत माहिती आहे का? डॉ. एकनाथ शिंदेची ही करामत आहे, अशा शब्दांत CM शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()