मुंबई - कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील (Sangli District) जत तालुक्यावर (Jat Taluka) दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असं म्हटलं आहे. यावरून वाद पेटला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath SHhinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde news in Marathi)
शिंदे म्हणाले की, गावांचा समावेश कऱण्याची मागणी २०१२ ची आहे. त्या भागात पाणीटंचाई होती. आता बऱ्याच योजना केला आहे. अनेक योजना मार्गी लागत आहे. पाण्यावाचून कोणतेही गाव इकडे-तिकडे जाणार नाही आणि एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, याची जबाबदारी आमची आहे.
या संदर्भात आमची बैठक झाली आहे. हा जुना वाद असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सीमावाद सामोपचाराने सोडवला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. शिवाय सीमा भागातील लोकांना मिळणाऱ्या योजनांमध्ये आम्ही वाढ केली. अनेक योजना सुरू केल्या. आरोग्याच्या सुविधा सुरू केल्या. याचा या भागातील लोकांना लाभ होणार असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.
शेतकरी नुकसानभरापाईबाबत शिंदे म्हणाले की, आतापर्यंत जो निर्णय नुकसान भरपाई देण्याबद्दल कधीही घेतला गेला नव्हता, तो निर्णय आमच्या सरकारने घेतला. सगळे नियम-निकष बदलले. एनडीआरएफचे नियम बाजुला केले. भरापाईसाठी निकष दोन हेक्टरचं तीन हेक्टर केले. गोगलगाईने झालेली नुकसानभरपाई दिली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अस आश्वासन शिंदे यांनी दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.