यंदाच्या वर्षी एल-निनोमुळे दुष्काळाची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच एल-निनो सक्रिय झाल्याची माहिती अमेरिकेच्या नोआ(National Oceanic and Atmospheric Administration) या संस्थेने दिली आहे. त्यामुळे आधीच मान्सूनच्या आगमनाला झालेला उशीर त्यातच एल-निनो सक्रिय झाल्याने यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. (Latest Marathi News)
प्रत्येक तीन ते सहा वर्षांनी भारतीय पावसाळ्याला दणका देणारा हा एल-निनोने २०१८ साली भारतात हजेरी लावली होती. त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. अशातच एल-निनो सक्रिय झाल्याची माहिती अमेरिकेच्या नोआ या संस्थेने दिली आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.(Marathi Tajya Batmya)
२०२३ च्या जून ते सप्टेंबर ह्या पावसाळी हंगामाच्या काळात १५ जुलै किंवा १ ऑगस्ट २०२३ नंतर पावसाला ओढ बसण्याची, दुष्काळाचे सावट, पाणी टंचाई, नापिकी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यंदाच्या मार्चपासून प्रशांत महासागराचे तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. मे अखेरपासून प्रशांत महासागराच्या सर्वच भागांचं तापमान हे ०.५ अंशांच्या वर नोंदले जात आहे.(Latest Marathi News)
‘सीपीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रशांत महासागरात सध्या क्षीण प्रकारचा ‘एल निनो’ अस्तित्वात असून उत्तर गोलार्धातील हिवाळ्यापर्यंत ‘एल निनो’ सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या नोव्हेंबर ते जानेवारी या काळात ‘एल निनो’ची तीव्रता सर्वाधिक राहण्याची शक्यता असून, तेव्हा ‘एल निनो’ची सर्वसाधारणपेक्षा अधिक तीव्रता राहण्याची शक्यता ८४ टक्के, तर तीव्र एल निनो राहण्याची शक्यता ५६ टक्के आहे.’(Marathi Tajya Batmya)
‘एल निनो’ची वर्षे आणि मान्सून हंगामातील पाऊस
२००२-सरासरीपेक्षा १९ टक्के कमी
२००४- सरासरीपेक्षा १३ टक्के कमी
२००९- सरासरीपेक्षा २३ टक्के कमी
२०१४-सरासरीपेक्षा १२ टक्के कमी
२०१५- सरासरीपेक्षा १४ टक्के कमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.