Loksabha Election Date: लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाच्या पत्राने खळबळ

निवडणूक आयोगाच्या एका पत्राने खळबळ निर्माण झाली आहे. या पत्रात सांगण्यात आलय की १६ एप्रिल, २०२४ या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जातील.
Loksabha Election Date: लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाच्या पत्राने खळबळ
Updated on

Loksabha Election Tentative Date Letter: निवडणूक आयोगाच्या एका पत्राने खळबळ निर्माण झाली आहे. या पत्रात सांगण्यात आलय की १६ एप्रिल, २०२४ या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जातील. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखेबद्दल चर्चांणा उधाण आलं. मात्र, निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. निवडणुक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख देण्यात आली आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

त्याआधी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सांगण्यात आलय की, निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख याचा आराखडा तयार करण्यासाठी १६ एप्रिल २०२४ ही तारीख ठरवण्यात आली आहे.

१६ एप्रिल हीचं निवडणुकीची तारीख असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर सीईओंनी ट्वीट करत या माहितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की पत्रात सांगण्यात आलेली तारीख ही फक्त संदर्भासाठी आहे.(Latest Marathi News)

काय म्हणाले दिल्लीचे सीईओ

दिल्लीच्या सीईओ कार्यालयातर्फे कऱण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलय की, '@Ceodelhioffice च्या एका पत्राचा हवाला देताना माध्यमांकडून सांगण्यात येतय की २०२४ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख १६ एप्रिल आहे. मात्र, हे स्पष्टपणे सांगण्यात येतय की जाहीर करण्यात आलेली तारीख ही निवडणूक आयोगला आराखडा आणि योजनेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणून जाहीर करण्यात आली होती.'

Loksabha Election Date: लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाच्या पत्राने खळबळ
Babri Banner in Pune: FTIIमध्ये झळकले बाबरी मशिदीचे वादग्रस्त बोर्ड, आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांकडून जाळण्यात आले बॅनर

दिल्ली सीईओ कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये निवडणूक आयोगालाही टॅग करण्यात आलं आहे. या फॉलोअप पोस्टमध्ये स्पष्टीकरण पुन्हा पोस्ट करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाहीत. मात्र एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूका जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Loksabha Election Date: लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाच्या पत्राने खळबळ
Mumbai Bulldozer Action: मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरची कारवाई, बेकायदा बांधकामे उध्वस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()