Maharashtra Politics: सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; कधी असणार निवडणुक?

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी अपडेट समोर
Election News
Election Newsesakal
Updated on

Elections To All Co-operative Societies In Maharashtra Postponed

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता या निवडणुका ३० सप्टेंबरनंतर घेण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी मोठा निर्णय जाहिर केला आहे. (Latest Marathi News)

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण आहे. मतदार शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

Election News
Lok Sabha 2024: लोकसभेवरून रणसंग्राम; काँग्रेसने हट्ट सोडला नाही, तर...; राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा

राज्यात ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. राज्यातील ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. हजारो सहकारी व गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी व मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.