विधान परिषदेच्या आठ जागांसाठी पुन्हा 'महाविकास'विरुद्ध भाजप!

विधान परिषदेच्या आठ जागांसाठी पुन्हा महाविकासविरुद्ध भाजप!
vidhan-parishad
vidhan-parishadSakal
Updated on
Summary

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर आता आठ जागांसाठी पुन्हा एकदा रणांगण सज्ज होऊ लागले आहे.

सोलापूर : विधान परिषदेच्या (Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भाजपला (BJP) धोबीपछाड दिल्यानंतर आता आठ जागांसाठी पुन्हा एकदा रणांगण सज्ज होऊ लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या आठ जागांसाठी येत्या एक ते दोन महिन्यात निवडणुका होण्याची शक्‍यता असल्याने राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असाच सामना रंगणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) आणि सोलापूर (Solapur) या दोन जिल्ह्यात निवडणुका होत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नगरमध्येही निवडणूक होत आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी काय निकाल लागतो? यावर भविष्यातील अनेक गणिते अवलंबून आहेत.

vidhan-parishad
प्रणिती शिंदेंचे समर्थक म्हणतात, 'राष्ट्रवादी'च आपला कट्टर शत्रू!

सोलापूरचे अपक्ष आमदार प्रशांत परिचारक, नगरचे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, कोल्हापूरचे कॉंग्रेस आमदार तथा राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबईतील कॉंग्रेस आमदार भाई जगताप, धुळे-नंदुरबारचे भाजप आमदार अमरिश पटेल, नागपूरचे भाजप आमदार गिरीश व्यास, शिवसेनेचे मुंबईतील आमदार रामदास कदम, शिवसेनेचे अकोला-बुलढाणा-वाशिम मतदार मतदार संघातील आमदार गोपीकिसन बाजोरिया या आठ जणांची मुदत 1 जानेवारी 2022 रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी या मतदार संघातील निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या मतदारसंघातील पात्र मतदारांची यादी निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. डिसेंबरमध्ये रंगणाऱ्या या राजकीय आखाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीतील निकालांचे पडसाद आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहेत. या आठ जागांमध्ये कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीच्या एक तर भाजपच्या दोन व भाजप पुरस्कृतच्या एका जागेचा समावेश आहे. या निवडणुकीत मोजके मतदार असल्याने निवडून येण्यासाठी आवश्‍यक असलेल्या क्‍लृप्त्या जो उमेदवार वापरतो, त्याचे पारडे जड मानले जाते. सोलापूरची जागा ही बहुतांशवेळा राष्ट्रवादीकडेच राहिलेली आहे. आगामी निवडणुकीत नगरची जागा राखण्यासोबतच सोलापूरची जागा खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कोल्हापुरात धनंजय महाडिक - बंटी पाटील या राजकीय लढाईला विधान परिषदेच्या याच मतदार संघातील मागील निवडणुकीपासून कलाटणी मिळाली होती. त्यामुळे यंदा कोल्हापुरात काय होणार? याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

vidhan-parishad
महाविद्यालयांमध्ये केवळ 77 टक्के विद्यार्थ्यांचीच हजेरी !

शिक्षक, पदवीधरमुळे वाढला आत्मविश्‍वास

यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीने पुणे पदवीधरमध्ये दिमाखदार यश मिळविले. नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षकमध्ये कॉंग्रेसलाही जबरदस्त यश मिळाले. त्यामुळे पुण्यापासून ते नागपूरपर्यंत कॉंग्रेसचा आत्मविश्‍वास वाढला आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नागपूर पदवीधरमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर आता नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी काय चमत्कार घडविणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()