३ विषयांत नापास विद्यार्थ्यांनाही अकरावीला प्रवेश! सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात

विज्ञान व वाणिज्य शाखेची इयत्ता अकरावीची प्रवेश क्षमता ५५ हजार ५०० इतकी असल्याने यावर्षी सर्व मुलांना त्यांच्या आवडत्या शाखेतून प्रवेश मिळणार आहे.
NDA
NDAsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील ६३ हजार १९६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यंदा ३० हजार ७८७ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक तर ३२ हजार १६ विद्यार्थ्यांना ६० ते ७४ टक्के गुण मिळाले आहेत. विज्ञान व वाणिज्य शाखेची इयत्ता अकरावीची प्रवेश क्षमता ५५ हजार ५०० इतकी असल्याने यावर्षी सर्व मुलांना त्यांच्या आवडत्या शाखेतून प्रवेश मिळणार आहे. तीन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही अकरावीला प्रवेश मिळणार आहे.

NDA
विवाहानंतर पतीने दिली साथ अन्‌ विश्वास! पत्नी दुसऱ्याच प्रयत्नात झाली फौजदार

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता पुढील प्रवेशाची ओढ लागली आहे. सोमवारपासून (ता. २०) अकरावी प्रवेशाला सुरवात होऊ शकते. त्यादृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाचे नियोजन सुरू झाले आहे. जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती निघत नाही, खासगी शाळांमध्ये मोठमोठे डोनेशन मागितले जाते आणि त्यामुळे ‘डी-टीएड’ला पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर कला शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विशेषत: मुलींची संख्या घटली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान व वाणिज्य शाखा किंवा डिप्लोमा, आयटीआयकडेच सर्वाधिक आहे. दरवर्षी आवडत्या कॉलेजमध्ये पाहिजे त्या विद्याशाखेतून प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची दमछाक होते. मात्र, विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, जिल्ह्यात विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता ३२ हजार असून वाणिज्य शाखेतूनही २३ हजार ५०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. मागील काही वर्षांत विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आता दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कल काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NDA
तरूणांसाठी खुशखबर! महाविकास आघाडी करणार एक लाख पदांची मेगाभरती

शाखानिहाय प्रवेश क्षमता

विज्ञान

३२,०००

वाणिज्य

२३,५००

कला

१७,०००

टेक्निकल व व्यावसायिक

२०८०

NDA
काँग्रेस शहराध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना आव्हान! PM केअर फंड, राफेलचीही ईडीने करावी चौकशी

१ ऑगस्टपासून सुरू होतील महाविद्यालये

निकालानंतर आता विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पाहिजे त्या कॉलेजमध्ये अर्ज करतील. त्यानंतर साधारणत: प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अकरावीची महाविद्यालये १ ऑगस्टपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालयांच्या स्तरावर होणार आहे.

NDA
काँग्रेस-शिवसेना लढणार एकत्र? जागा वाटपात राष्ट्रवादीला घ्यावे लागणार एक पाऊल मागे
  • सोलापूर पुणे विभागात अव्वल;

  • दहावीत ५३ हजार विद्यार्थ्यांना

  • ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण

सोलापूर : डोक्यावर कोरोनाचे संकट, मनात विषाणूची भीती असतानाही विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारली आहे. जिल्ह्यातील ६४ हजार ६५२ पैकी ६३ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, ५३ हजार ८०३ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोरोनामुळे यंदा बोर्डाने विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा जवळील शाळेत परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. या पार्श्वभूमीवर ६०१ विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बोर्डाच्या वतीने जुलै महिन्यात विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी त्यानिमित्ताने मिळणार आहे. जिल्ह्याचा निकाल ९७.७४ टक्के लागला असून, त्यात ९८.१५ टक्के मुली तर ९७.१४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील एक हजार ८९ शाळांपैकी ९९० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, विस्ताराधिकारी अशोक भांजे यांच्यासह माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले आहे.

NDA
८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत! लसीकरणामुळे मृत्यूदर घटला; ७.२५ कोटी व्यक्ती सुरक्षित

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही अकरावीत शिकण्याची संधी

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील एक हजार ४५६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तीन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. पण, जुलै महिन्यात होणाऱ्या फेरपरीक्षेत ते विद्याथी सर्व विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यादृष्टीने हा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी चिंता न करता पुढील परीक्षेचा अभ्यास करावा, असे आवाहन विस्ताराधिकारी अशोक भांजे यांनी केले आहे.

NDA
राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?

विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ५३ हजार उत्तीर्ण

जिल्ह्यातील ६४ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यात ३६ हजार १३५ मुले तर २८ हजार ५१७ मुली आहेत. त्यापैकी ३५ हजार १०२ मुली तर २८ हजार ९४ मुले उत्तीर्ण झाले आहेत. ९८.१५ टक्के मुली आणि ९७.१४ टक्के मुले या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तब्बल ३० हजार ७८७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर २३ हजार १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.