Maharashtra Politics: रामदास कदमांच्या मुलाची अध्यक्षपदी केलेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात? कोणी केले आरोप, वाचा सविस्तर

Maharashtra Politics: शिवसेना नेते रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम यांची एमपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

Maharashtra Politics: शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची साथ देणारे आणि माध्यमांसमोर महायुतीत मित्रपक्ष असलेल्या भाजपावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेल्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या मुलावर काल(गुरूवारी) मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रामदास कदम यांचा धाकटा मुलगा सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे

रामदास कदम यांनी सकाळीच भाजपवर केला होता हल्लाबोल

महाराष्ट्रात आम्ही (शिवसेना-राष्ट्रवादी) मोदी-शाह यांच्या कामावर विश्वास ठेऊन सोबत आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता भाजपाने घेणं आवश्यक आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

पुढे रामदास कदम म्हणाले होते, 'महाराष्ट्र भाजपाच्या माध्यमातून घृणास्पद काम सुरू आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. परंतु तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसाने गळा कापू नका. भविष्यात तुम्ही यातून वेगळा संदेश महाराष्ट्राला देताय याचे भान भाजपाच्या लोकांना असणे गरजेचे आहे असंही त्यांनी म्हटलं होतं.

Maharashtra Politics
Women's Day : 2023 मध्ये मालमत्ता खरेदी करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट; 9388 महिलांनी 9293 कोटींची खरेदी केली घरे

त्यानंतर दुपारी रामदास कदम यांचे पुत्रे सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांची निवड नियमांना धरून आहे का असे सवाल आता विरोधक करत आहेत.

यासंबधी इंडियन एक्सप्रेसने एक रिपोर्ट केला आहे. त्यामध्ये नियमांनुसार, पर्यावरण संरक्षणाशी संबंधित बाबींचा 25 वर्षांचा अनुभव असलेल्या किंवा पर्यावरण संरक्षणाशी संबंधित बाबी हाताळणाऱ्या संस्थांचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाच या पदावर नियुक्त करता येईल, असं म्हटलं आहे.

Maharashtra Politics
Sharad Pawar on Sunil Shelke: "...तर याद राखा शरद पवार म्हणतात मला"; कार्यकर्त्यांसमोरच सुनील शेळकेंना पवारांचा कडक इशारा

सिद्धेश कदम हे भाजप-शिवसेना सरकारमधील माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे धाकटे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेत भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मागे टाकत असल्याचे सांगत रामदास कदम यांनी गुरुवारी भाजपवर हल्लाबोल केला होता. महाराष्ट्र सरकारने ६ मार्च रोजी अधिसूचना जारी करून पूर्वीचे विद्यमान आयएएस अधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांना पदावरून हटवले. गेल्या काही दिवसापासून ते गैरहजर असल्याचे कारण देत त्यांनी अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.

संजय राऊत यांचे आरोप

संजय राऊत यांनी याबाबत सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारमध्ये सर्व गोष्टी घटानबाह्य होत असल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Politics
Sharad Pawar in Lonavala: शरद पवारांची खेळी अजितदादांवर भारी! राजीनामा दिलेले 137 पदाधिकारी पुन्हा पक्षात

काय आहेत नियम?

MPCB ​​च्या पदासाठी पात्रता ठरवणारे नियम असे नमूद करतात की, पर्यावरण संरक्षणाशी संबंधित बाबींमध्ये 25 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

त्या पदावर नियुक्त झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत, तो सचिव किंवा त्याहून अधिक पदावर असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेत आहे किंवा आहे असे नियम सांगतात. त्यांची या पदावर नियुक्ती होऊ शकते.

त्याचबरोबर एखाद्या विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा पर्यावरण किंवा नागरी संबंधित विषयात अभियांत्रिकीमध्ये पदवीधर पदवी असणे देखील आवश्यक आहे.

एमपीसीबीच्या माजी अध्यक्षांपैकी एकाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने अशा महत्त्वाच्या पदांवर नियुक्तीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आधीच्या अध्यक्षांवर पात्रतेबाबत खटला होता आणि तोच प्रकार इथेही होऊ शकतो.

Maharashtra Politics
Loksabha Election: एकेकाळी मुलाप्रमाणे वागवलेले आनंद परांजपे अपक्ष लढणार? कल्याण लोकसभेत शिंदे VS राष्ट्रवादी लढणार असल्याच्या चर्चेला उधाण

सिद्धेश कदम काय म्हणाले?

या नियुक्तीबाबत सिद्धेश कदम म्हणाले की, माझ्या नियुक्तीपूर्वी सरकारने माझ्याकडून कागदपत्रे मागितली होती. मी या पदासाठी ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता केली नसती तर माझी नियुक्ती झाली नसती. त्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यांनी भारताबरोबरच परदेशातही पर्यावरणविषयक समस्यांवर काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.