Maharashtra News: राज्यात 6 ठिकाणी भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा; स्थानिक वंशावळीच्या गाय-म्हशींवरील घटीवर उपाय

Animal
Animal esakal
Updated on

Maharashtra News : राज्यातील पशुधनाची संख्या एक कोटी ३९ लाख इतकी असून, मागील पशुगणनेच्या तुलनेत ही दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. राज्यात डांगी, देवणी, गवळाऊ, खिल्लार आणि लाल कंधारी या गोवर्गीय नोंदणीकृत पशुधनाची संख्या कमी होत आहे.

शिवाय गिर, साहिवाल, थारपारकर अशा उच्च जनुकीय गुणवत्तेच्या इतर भारतीय गोवर्गीय जातीच्या पशुधनात घट होत आहे. (Embryo Transplantation Laboratory at 6 places in state maharashtra news)

त्यावर उपाय म्हणून या वंशावळीच्या संवर्धनासाठी मल्टिपल ओव्हुलेशन ॲन्ड एंब्रियो ट्रान्स्फर आणि ओव्हम पिकअप-इनव्हिट्रो फर्टिलायझेशन या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यासाठी सहा महसुली विभागात सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना केली जाईल.

विभागनिहाय स्थापन होणाऱ्या प्रयोगशाळेचे स्थळ असे : मुंबई-पेण (जि. रायगड) येथील जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, नागपूर-हेटिकुंडी (जि. वर्धा) येथील पशुपैदास प्रक्षेत्र, पुणे-ताथवडेचे वळूमाता प्रक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर-वळू संगोपन केंद्र, नाशिक-लोणी बुद्रुक (ता. राहता), अमरावती-अकोलाचे जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र.

Animal
Maharashtra News : राज्यातील पहिल्या स्प्रिंगर पुलावरील भगदाडची तज्ज्ञांकडून आज पाहणी; नाशिकहून विशेष पथक येणार

प्रत्येक प्रयोगशाळेसाठी इमारत बांधकाम, स्वच्छ रूम, संयत्रे व उपकरणे, सयंत्रासह मोबाईल व्हॅन, प्रशासकीय अशा खर्चासाठी चार कोटी ५० लाख याप्रमाणे एकूण २७ कोटी चार लाख खर्चाला आणि दर वर्षीच्या आवर्ती खर्चाला सरकारने मान्यता दिली आहे. शिवाय सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, जैवतंत्रज्ञ, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा मदतनीस, वाहनचालक, परिचर अशा एकूण ४८ पदे सहा प्रयोगशाळेसाठी मंजूर करण्यात आली आहेत.

आकडे बोलतात

- भारतीय अर्थव्यवस्थेत २०२१-२२ मध्ये एकूण स्थूल उत्पादनामध्ये ४.११ टक्के हिस्सा पशूधन क्षेत्राचा राहिला

- २०१२ ते २०१९ या कालावधीत देशातील पशुधनात एक टक्क्यांनी वाढ

- मागील पशुगणनेच्या तुलनेत देशी पशूधन संख्येत सहा टक्क्यांनी घट

Animal
Maharashtra News : देशांतर्गत जानेवारी ते ऑगस्टमध्ये विमानाने 12 कोटी जणांचा प्रवास; प्रवासी संख्येत वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.