Empire State Building - राज ठाकरेंनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रस्ते आणि खड्डे यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरले, यावेळी बोलत असताना सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी एका खास बिल्डिंगचा उल्लेख केला.
राज्यात वेग वेगळ्या ठिकणी सतत पाऊस पडत आहे त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याबद्धल ठाकरे पत्रकारांशी बोलत होते अनेक ठिकाणी रस्ता कागदावरच राहतो, वास्तविक रस्त्यावर मुरूम असतो, आणि पावसाळ्यात खड्डे पडतात.
ही रस्त्याची दुरावस्था फक्त गावं-गाड्यात आहे, असं नाही महामार्गावरसुद्धा रस्त्यांची दुरावस्था आहेच. मुंबई-गोवा महामार्ग गेली १७ वर्ष पूर्ण करत आहेत. पण अजून 'तो' झाला नाही यावरून त्यांनी त्यांच्या आवडीच्या बिल्डिंगचा दाखला देत रस्त्याच्या मुद्द्यावरून टीका केली. आपल्या मनात प्रश्न येईल ती बिल्डिंग कोणती ?
राज ठाकरेंना आवडणाऱ्या 'त्या' बिल्डिंग बद्दल..
राज ठाकरे एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, ती बिल्डिंग पाहून त्यांना कौतुक वाटले. त्यांनी 'त्या' बिल्डिंग बद्धल माहिती घेतली. एम्पायर स्टेट बिल्डिंगचे बांधकाम चौदा माहित्यात पूर्ण झाले आहे. ही बिल्डिंग 102 मजली आहे. ही बिल्डिंग जगातली सर्वात उंच बिल्डिंग आहे.
एम्पायर स्टेट बिल्डिंगची उंची १४५३ फूट अर्थात ४४३ मीटर आहे या इमारतीतल्या लिफ्टने एका मिनिटात ८६व्या मजल्यावर जाता येते. या इमारतीवर १९४५ साली दाट धुक्यामुळे भरकटलेल्या विमामाने ७९ आणि ८० व्या मजल्यावर धडक मारली. एकूण १४ लोक यात मारले गेले.
ही घटना घडली शनिवारी आणि तरीही सोमवारी सकाळी याच बिल्डिंगध्ये कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर हजर झालेले बेटी लॉ ऑलिव्हर या बाईंच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल तितकाच तो भयंकर हि, त्या दिवशी बेटी लॉ ऑलिव्हर ८० व्या मजल्यावर काम करत होती.
विमानाच्या अपघातात भाजली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी ४० मिनिटात आग विझवली आणि तिला लिफ्टने खाली आणण्याचा निर्णय घेतला.
आगीमुळे लिफ्टचे दोरही गरम होऊन नाजूक झाले होते याची त्यांना काय कल्पना आली नसावी. बेटी लॉ ऑलिव्हरला लिफ्टमध्ये बसल्यावर त्या दोघांनी प्राण सोडला आणि लिफ्ट वायुवेगाने खाली आली जवळ जवळ ७५ मजले लिफ्ट खाली आला आणि तरीही बाई जिवंत होती.
खाली असलेल्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तिला तेथून बाहेर काढून दवाखान्यामध्ये तिच्यावर उपचार केले काही महिन्यांनी त्या ठणठणीत झाल्या. गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदला गेलेला हा एक भयानक चमत्कार म्हणावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.