Rojgar Melava : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत ९ व १० डिसेंबर रोजी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील जमनालाल बजाज भवनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. (Employment fair on 9th and 10th December at Nagpur nashik news)
जास्तीत जास्त नियोक्ते व नोकरी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी नाशिक अनिसा तडवी यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या/नियोक्ते उपस्थित राहणार आहेत. रोजगार मेळाव्यात सहभागी ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.mahswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhay Job Fair या ऑप्शनवर क्लिक करून Pandit Dindayal Upadhay Maharojgar Mahaseva यावर रिक्तपदे अधिसूचित करावयाची आहेत. याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १८००१२०८०४०, nagpurrojgar@gmail.com येथे संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.