साताराः शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. राज्य सरकारच्या या कारवाईचं कौतुक होत आहे. आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एक आदेश काढला. यामध्ये प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला, याचा देखावा असणार आहे. सोबत लाईट आणि साऊंड शो असेल. या शिवप्रताप स्मारकामुळे शिवरायांचा ज्वलंत इतिहास उजळून निघणार आहे.
हेही वाचाः Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
१९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. गुरुवार, दि. १० नोव्हेंबर रोजी अफझल खानाच्या कबरीजवळ झालेले अतिक्रमण हटवण्यात आले. यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली होती.
या कारवाईदरम्यान अफझल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आलेल्या आहेत. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुतेश जयवंशी यांनी या माहितीला दुजोरा दिला. यासंबंधी आणखी माहिती घेण्याचं काम महसूल प्रशासन करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.