सोलापूर : शहरातील एका शाळेने १६ जून २०१४ मध्ये डीएड पूर्ण केलेल्या सहशिक्षकाची नेमणूक केली. पण, धक्कादायक बाब म्हणजे त्या शिक्षकाचे डीएड जून २०१६ मध्ये पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्या शिक्षकाने पूर्वी जोडलेले प्रमाणपत्र चुकीचे की बरोबर, याचा शोध शिक्षणाधिकारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविलेल्या शालार्थ आयडीच्या १९१ प्रस्तावात त्रुटी काढल्या आहेत. पाचवी ते आठवीच्या वर्गांवर शिक्षक नेमताना ३१ मार्च २०१९ पूर्वी त्या उमेदवाराने टीईटी उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. हा नियम माहिती असतानाही अनेक शाळांनी टीईटी उत्तीर्ण नसलेल्यांचे प्रस्ताव सादर केले आहेत.
दुसरीकडे मंजूर पदांपेक्षा जास्त उमेदवारांचे प्रस्ताव देखील पाठविल्याची बाब पडताळणीत समोर आली आहे. एका संस्थेने सहशिक्षक नेमणुकीसंदर्भात ३० जुलै २०१३ रोजी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात दिली. मात्र, त्याची नेमणूक २ जुलै २०१२ मध्येच केल्याचीही बाब उघड झाली आहे. काहींनी खुल्या प्रवर्गासाठी तेवढ्या जागा नसतानाही भरल्या आणि त्यांचा प्रस्ताव शालार्थ आयडीसाठी पाठविल्याचे समोर आले आहे. गंभीर स्वरूपाच्या त्रुटींबाबत संबंधित संस्थांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील ‘या’ शाळांच्या प्रस्तावात त्रुटी
सांगोला : बलवडी कन्या प्रशाला, सांगोला विद्यामंदिर.
उत्तर सोलापूर : जी.बी. घोडके विद्यालय (नान्नज), महात्मा फुले हायस्कूल (मार्डी).
बार्शी : जय हनुमान प्रशाला (झरेगाव), कै. चांगदेव लक्ष्मण घोडके विद्यालय (मालेगाव), चांगदेव पाटील माध्यमिक विद्यालय (दहिटणे), कै. शहाजीराव काकडे प्रशाला (ढोराळे)
सोलापूर : राजेश्वरी माध्यमिक प्रशाला, ज्ञानसंपदा प्रशाला, श्री. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल, भवानी पेठ (सोलापूर व बोरामणी), श्रीदत्त प्रशाला, श्रीमती नरसम्मा बंडा प्रशाला, कै. रामगोंडप्पा केंगनाळकर हायस्कूल, आयडीयल उर्दू विद्यालय, श्री. वीरतपस्वी चन्नवीर हायस्कूल, अक्कलकोट रोड, अलहाज ए.डी. शेख उर्दु हायस्कूल, कै. मातोश्री मलकव्वा हणंतम्मा बिराजदार पाटील प्रशाला, रोशन प्रशाला, राजर्षी शाहु माध्यमिक विद्यालय (विडी घरकूल).
मंगळवेढा : कै. श्रीपतराव माने विद्यालय (लवंगी), एम. पी. मानसिंगका विद्यालय (सोड्डी), विद्यानिकेतन विद्यालय (जालिहाळ हिवरगाव)
माळशिरस : चंद्रकांत घुगरदरे प्रशाला (नातेपुते), कन्या प्रशाला व विवेकानंद ज्युनिअर कॉलेज.
दक्षिण सोलापूर : गणेश रामचंद्र चितळे प्रशाला (बारणूर), श्री. पंचाक्षरी विद्यामंदिर (माळकवठे), यशवंत विद्यालय (औराद), श्री सिद्धाराम म्हेत्रे प्रशाला (कुंभारी), लोकसेवा महाविद्यालय (मंद्रूप), न्यू इंग्लिश स्कूल (दोड्डी), कै. कोंडिबा इंगळे हायस्कूल (कर्जाळ).
अक्कलकोट : अनंत चैतन्य प्रशाला (हन्नूर), बणजगोळ प्रशाला, श्री काशीविश्वेश्वर प्रशाला (जेऊर), मंगरूळे प्रशाला.
पंढरपूर : विद्या विकास मंदिर व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कनिष्ठ महाविद्यालय (उंबरे पागे), अण्णासाहेब पाटील विद्यालय (तिसंगी), विद्या विकास प्रशाला (टाकळी (लक्ष्मी), श्री दत्त विद्यामंदिर (येवती), मातोश्री रुक्मिणी गंगाराम होळकर विद्यालय (होळे), श्री पटवर्धन कुरोली प्रशाला, डॉ. पतंगरावजी कदम माध्यमिक विद्यालय (पळशी), राजनंदिनी माध्यमिक विद्यालय (कौठाळी), बोहाळी विद्यालय, स्व. धीरुभाई अंबानी विद्यालय (शेगाव दु.)
करमाळा : त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनिअर कॉलेज (टाकळी), शरदचंद्रजी पवार विद्यालय (वाशिंबे), दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय (सावडी), श्री जगदंबा विद्यालय (वाफळे), संघमित्रा माध्यमिक विद्यालय (कुर्डुवाडी), विनायकराव पाटील विद्यालय (भोसरे).
मोहोळ : संभाजीराव शिंदे प्रशाला (इंचगाव), कै. शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय (अनगर).
माढा : प्रबोधनकार ठाकरे विद्यालय (कव्हे), विमलेश्वर विद्यालय (बेंबळे), पूज्य सुगंधाताई पाटील विद्यालय (चिंचोली), पालवण माध्यमिक विद्यालय, मा. बबनरावजी शिंदे विद्यालय (अकोले खुर्द).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.