दरवर्षी 4000 अभियंते होतात पुणेरी सोलापूरकर! आयटी पार्कअभावी कुंटुंब सोडून तरुणांवर स्थलांतराची वेळ; अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य म्हणतात...

जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ, 14 नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तेथून दरवर्षी 5000 अभियंते शिक्षण पूर्ण करतात. परंतु, आयटी इंडस्ट्रीज व अभियंत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे मोठमोठे उद्योग सोलापुरात नसल्याने दरवर्षी अंदाजे 4000 अभियंत्यांना कुटुंब सोडून स्थलांतर करावे लागत आहे.
solapur
आयटी पार्कSakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ, १४ नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तेथून दरवर्षी पाच हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात. परंतु, आयटी इंडस्ट्रीज व अभियंत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे मोठमोठे उद्योग सोलापुरात नसल्याने दरवर्षी अंदाजे चार हजार अभियंत्यांना कुटुंब सोडून बंगळूर, पुणे, हैदराबाद, मुंबई अशा ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. त्यात पुणेरी सोलापूरकर होणाऱ्या अभियंत्यांची संख्या लक्षणीय आहे.

सोलापूर जिल्ह्यात ११० टीएमसीचे उजनी धरण, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी उत्तम, गुन्हेगारीचे प्रमाणही कमी आहे. पुणे, बंगळूर, हैदराबाद अशा शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाणी म्हणून सोलापूर परिचित आहे. याशिवाय पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळूरच्या तुलनेत जागेचे दर कमी, टॅक्स सवलतीची प्रशासनाची तयारी व पुणे, बंगळूर, मुंबईसारखी वाहतूक कोंडी नाही, हॉटेल्स सुविधा उत्तम, रेल्वेची सुविधाही दर्जेदार आणि आगामी काळात विमानसेवा सुरू होईल.

एवढ्या साऱ्या सुविधा असतानाही सोलापुरात आयटी कंपन्या का आल्या नाहीत, याचे आत्मचिंतन लोकप्रतिनिधींना करावे लागेल. म्हातारपणी पालकांचा आधार असलेले तरुण त्यांच्यापासून नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर करीत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी सोलापुरात आयटी कंपन्या येण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लागेल, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरूणांच्या क्रयशक्तीचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करणे काळाची गरज असल्याचेही त्यांचे मत आहे.

आयटी कंपन्यांसाठी सोलापुरात पोषक वातावरण

आयटी इंडस्ट्रीजच्या दृष्टीने सोलापूर सुटेबल असून पुणे, बंगळूर, हैदराबाद या शहरांशी रोड व रेल्वे कनेक्टिव्हिटीही उत्तम आहे. आयटी उद्योगाला पाण्याची फार गरज असते, त्यामुळे पाण्याचाही प्रश्न नाही. सोलापुरात आयटी कंपन्या आल्यास निश्चितपणे तरुणांना परजिल्ह्यात जावे लागणार नाही. सध्या आयटी उद्योगात जॉबच्या संधी खूप असल्याने तरुणांचा कल तिकडेच आहे.

- डॉ. विजय आठवले, प्राचार्य, डब्ल्यूआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर

--------------------------------------------------------------------------

सोलापुरात आयटी इंडस्ट्रिजची गरज

आयटी, स्वॉप्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये नोकरीच्या खूप संधी असल्याने तरुणांचा कल कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या अभ्यासक्रमांकडेच आहे. याशिवाय दुसऱ्या अभ्यासक्रमांचे विद्यार्थीही परजिल्ह्यात जात आहेत. आपल्याकडे सर्व सोयी-सुविधा असतानाही आयटी इंडस्ट्रीज नाहीत. सोलापुरात आयटी कंपन्या आल्यास निश्चितपणे तरुणांना दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार नाही.

- डॉ. बी. के. सोनगे, प्राचार्य, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर

--------------------------------------------------

आयटी कंपन्या सोलापुरात आल्यास अभियंत्यांना येथेच मिळतील जॉब

आमच्या महाविद्यालयातून दरवर्षी इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर व आयटी या अभ्यासक्रमातून दोनशेपर्यंत अभियंते शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. आपल्याकडे आयटी इंडस्ट्रीज नसल्याने प्लेसमेंटमधून बहुतेक तरुण- तरुणी बंगळूर, हैदराबाद, पुणे, मुंबई अशा ठिकाणी जॉबसाठी जातात. सोलापुरात आयटी कंपन्यांसाठी पोषक वातावरण असून आयटी पार्कसाठी प्रयत्न जरुरी आहेत.

- डॉ. व्ही. व्ही. पोतदार, प्राचार्य, ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर

--------------------------------------------------------------------

दरवर्षी पाच हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात, पण...

जिल्ह्यात १४ अभियांत्रिकी महाविद्यालये असून दरवर्षी अंदाजे पाच हजार विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करतात. विविध कंपन्यांचे प्लेसमेंट त्याठिकाणी होते आणि जिल्ह्यातील जवळपास एक हजार ते बाराशे विद्यार्थी परजिल्ह्यातील आयटी कंपन्यांमध्ये जॉबला लागतात. आयटी इंडस्ट्रीज आल्यास निश्चितपणे सोलापुरातील तरुणांना याच ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव (सोलापूर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com