सर्वांनीच ‘हा’ क्रमांक तोंडपाठ करावा, ८ मिनिटात पोलिसांची मिळेल मदत! अडचणीतील महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच मदत; पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांचे विशेष लक्ष

मद्यपान करून पती भांडण करत आहे, सासरचे लोक छळ करी आहेत, अशा कारणांसाठी सात महिन्यांत सोलापूर शहरातील चार हजार ५२ महिलांनी तर अडचणीतील ६३९ ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना ‘डायल ११२’वर कॉल करून मदत घेतली आहे. पोलिसांनी अवघ्या आठ मिनिटांतच मदत केली आहे.
police
police sakal
Updated on

सोलापूर : मद्यपान करून पती भांडण करत आहे, सासरचे लोक छळ करी आहेत, अशा कारणांसाठी मागील सात महिन्यांत सोलापूर शहरातील चार हजार ५२ महिलांनी तर अडचणीतील ६३९ ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना ‘डायल ११२’वर कॉल करून मदत घेतली आहे. याशिवाय गल्लीतील गोंधळ, ट्रॅफिक जाम, साप निघालाय, वसुलीसाठी त्रास, सोसायटीत अनोळखी व्यक्ती आलीय, अशा कारणांसाठीही साडेसहा हजारांहून अधिक कॉल पोलिसांना आले. विशेष बाब म्हणजे, त्या सर्वांना पोलिसांनी अवघ्या आठ-साडेआठ मिनिटांतच मदत केली आहे.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाकडे (भरोसा सेल) दरमहा जवळपास १५० ते १८० तक्रारी केवळ कौटुंबिक छळाच्याच येतात. याशिवाय दोन गटातील हाणामारी, किरकोळ वाद, चोरी, घरफोडीसह अन्य गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होतात. पण, ज्या व्यक्तींना पोलिस ठाण्याला जाणे त्यावेळी शक्य नसते, मात्र पोलिसांची मदत लागणार आहे, अशांसाठी ‘डायल ११२’ हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या क्रमांकावर कॉल करून अडचणीत मदत मागणाऱ्यांजवळ तथा घटनास्थळी शहर पोलिस आठ ते साडेआठ मिनिटांतच पोचतात. पण, खोटी माहिती देऊन कॉल करणाऱ्यांवर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो.

पोलिस ठाणे लांब; ‘डायल ११२’वर वाढले कॉल

पूर्वेला मुळेगाव रोडपर्यंत, पश्चिमेला डोणगावपर्यंत, दक्षिणेला सोरेगाव तर उत्तरेला तळे हिप्परगापर्यंत शहर पोलिसांची हद्द आहे. त्या तुलनेत शहरात अवघी सात पोलिस ठाणी असून तिही शहरात आहेत. त्यामुळे शहराच्या टोकाला राहणाऱ्यांना पोलिसांची मदत मिळविण्यासाठी दूर अंतरावरून वाहन करूनच तिथंपर्यंत यावे लागते. बंद पोलिस चौक्या देखील सुरू नाहीत. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी ते २८ जुलैपर्यंत शहरातील ११ हजार ६१६ जणांनी ‘डायल ११२’वर कॉल करून पोलिसांची मदत घेतली आहे.

पोलिस आयुक्तांकडून विशेष लक्ष

‘डायल ११२’वर कॉल करणाऱ्या अडचणीतील व्यक्तींना पोलिसांकडून वेळेत मदत मिळते का, याची पडताळणी स्वत: पोलिस आयुक्त करतात. त्याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. ज्या ठिकाणी मदत पोचायला विलंब लागतो, अशा ठिकाणी म्हणजेच विजापूर नाका पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाण्याला एक बीट मार्शल जास्त दिला आहे. ‘डायल ११२’वर कॉल करणाऱ्यांना सरासरी आठ मिनिटांत मदत मिळते.

- राजन माने, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सात महिन्यांतील ‘डायल ११२’वरील कॉल

  • महिलांचे कॉल

  • ४,०५२

  • रस्ते अपघात

  • ३७८

  • लहान मुलांचे भांडण

  • १६४

  • मद्यपानाच्या तक्रारी

  • ८२२

  • ट्रॅफिक जाम, आत्महत्येचा प्रयत्न

  • १,२८५

  • ज्येष्ठ नागरिक अडचणीत

  • ६३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.