भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या कम्प्युटरमध्ये हॅकर्संनी टाकले कथित पुरावे

स्टॅन स्वामींनी सुरुवातीच्या काळात पुजारी म्हणून काम केले, पण नंतर आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देण्यास सुरुवात केली.
भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या कम्प्युटरमध्ये हॅकर्संनी टाकले कथित पुरावे
Updated on

नवी दिल्ली - भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात फादर स्टॅन स्वामी यांच्याबाबत एका अमेरिकन फॉरेन्सिक कंपनीच्या नव्या अहवालात अनेक खुलासे झाले आहेत. फादर स्टॅन स्वामी यांच्या कम्प्युटरमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हॅकर्सद्वारे टाकण्यात आल्याचं अहवालात स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या कम्प्युटरमध्ये हॅकर्संनी टाकले कथित पुरावे
Nitesh Rane : ...तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन; नितेश राणे कोणावर संतापले

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपांवर अमेरिकन फॉरेन्सिक फर्मने या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एनआयएने आपल्या चौकशीत फादर स्टॅन स्वामी आणि कथित माओवादी नेत्यांमध्ये कथित इलेक्ट्रॉनिक संवादाचे गंभीर आरोप केले होते.

फादर स्टॅन स्वामी यांच्या वकिलांनी सांभाळलेली बोस्टनस्थित फॉरेन्सिक संस्था आर्सेनल कन्सल्टिंग म्हणते की, तथाकथित माओवादी पत्रांसह सुमारे ४४ कागदपत्रे अज्ञात सायबर हॅकरने स्टॅन स्वामी यांच्या कम्प्युटरमध्ये टाकली होती. यामुळे स्टॅन स्वामी यांच्या कम्प्युटरमध्ये एनआयएने दावा केलेले डॉक्युमेंट आढळून आले.

भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या कम्प्युटरमध्ये हॅकर्संनी टाकले कथित पुरावे
Weird Presentation : वर्षभरात तिनं अनेकांना केलं 'KISS'; PPT शेअर करत...

स्टॅन स्वामींनी सुरुवातीच्या काळात पुजारी म्हणून काम केले, पण नंतर आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देण्यास सुरुवात केली. झारखंडमध्ये आदिवासी आणि दलितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मानवी हक्क कार्यकर्ते या नात्याने त्यांनी विस्थापनविरोधी जनविकास चळवळीचीही स्थापना केली होती. फादर स्टॅन स्वामी हे १९९६ साली युरेनियम कॉर्पोरेशनच्या विरोधात आंदोलन छेडणाऱ्या झारखंड ऑर्गनायझेशन अगेन्स्ट युरेनियम रेडिएशन या संघटनेशीही संबंधित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()