Pankaja Munde : 'कुठल्या घोड्यावर बसल्यानंतर फायदा होईल, हे आधी ठरवावं'; पंकजा मुंडेंना चव्हाणांचा खास सल्ला

फायद्याचं बघा म्हणत पंकजा मुंडेंना अशोक चव्हाण यांनी दिला सल्ला
Pankaja Munde
Pankaja MundeEsakal
Updated on

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षात सतत डावललं जात. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून अन्याय होत असल्याचंही सतत बोलल जातं. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पक्षात येण्यासाठीची खुली ऑफर दिली आहे. सातत्याने भाजपकडून अन्याय होत असून पंकजा यांच्यासाठी मातोश्रीची दारे उघडी असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं.

या संदर्भात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांना उत्तम राजकीय जाण आहे. त्यामुळे कोणत्या घोड्यावर बसल्यावर जास्त फायदा आहे, हे त्यांनी ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये वारंवार अन्याय होत आहे. त्यांना डावलण्यात येत आहे. आगामी निवडणुकांपूर्वी त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. अशातच त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेत यावं अशी विनंती केली आहे. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde
Chandrashekhar Bawankule : सभेत डुलकी घेणाऱ्या भाजप नेत्यांच्या व्हिडीओवर बावनकुळे म्हणतात...

काय म्हणाले आहेत अशोक चव्हाण?

पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘ गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांचं काम मी पाहतोय. सभागृहात त्या प्रभावीपणे काम करतात. त्यांना उत्तम जाण आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणत्या पक्षात जावं, यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. कुठल्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो, हे त्यांनी ठरवायचंय, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

Pankaja Munde
Pune News : पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.