सरकारने इतके घोळ घातले आहेत की आता या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
राज्यात आरोग्य विभागाच्या क आणि ड गटातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांसह विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्या नसून पुढे ढकलण्यात आल्या आहेत असं सांगून दिलासा दिला आहे. मात्र तरीही विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, २५,२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मंत्री महोदयांनी फेसबुकवरून सांगितलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. आदल्या दिवशी सांगितलं जातं की परीक्षा रद्द झाली. नेमकं या सरकारमध्ये काय चाललंय. परीक्षा कधीही घेतात, कधीही रद्द करतात. काहीच ताळतंत्र नाहीय. कुणाला मध्य प्रदेशात तर कुणाला उत्तर प्रदेशातलं प्रवेश पत्र मिळालंय. मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे.
परीक्षा पुढे ढकलल्या त्यावरून फडणवीसांनी गंभीर असा आरोप केला असून आता दलाल मार्केटमध्ये उतरले आहेत असे ते म्हणाले. दलालांकडून पाच ते दहा लाख रुपये गोळा केले जातायत असं त्यांनी म्हटलं. विद्यार्थ्यांचे नुकसान करायचं सुरु आहे. आता याविरोधात आम्ही आम्ही आंदोलन करू असा इशाराही फडणवीसांनी दिला. दलाली होत असेल तर चौकशी झाली पाहिजे. हे दलाल कोण हे समोर आलं पाहिजे. विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन आले. पाच ते दहा लाख रुपये मागितले जातायत असेही ते म्हणाले.
राज्य सरकारने आमची जबाबदारी फक्त प्रश्नपत्रिका तयार करण्याची होती. यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडून असमर्थता दर्शवण्यात आली असे सांगत आरोग्य मंत्र्यांनी याचे खापर न्यासावर फोडल्याबाबत फडणवीसांना विचारले. यावर आता कोणीही घोळ केला असला तरी कारवाई झाली पाहिजे. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. सरकारने इतके घोळ घातले आहेत की आता या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.