अतिरिक्‍त ऊसाचा प्रश्‍न गंभीर! 30 एप्रिलपर्यंत चालणार गाळप हंगाम

सरासरी 10 टक्‍के एफआरपी गृहीत धरून शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी, असे साखर आयुक्‍तालयाचे आदेश आहेत. मात्र, त्यानुसार अंमलबजावणी होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
The sugarcane season
The sugarcane seasonESAKAL
Updated on

सोलापूर : सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांचे गाळप सध्या सुरु असून अतिरिक्‍त उसामुळे ते कारखाने आता एप्रिलअखेर सुरु राहतील, असे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. 15 ऑक्‍टोबरनंतर गाळप हंगाम सुरु होऊन आता मार्च उजाडला, तरीही जिल्ह्यातील ऊस शेतातच उभा आहे. महावितरणने वीज तोडली असून उसाला तुरा आल्याने शेतकऱ्यांसमोर जगावे की मरावे, असा प्रश्‍न उभा आहे.

The sugarcane season
सोलापूरचे निर्बंध शिथिल कधी? शहरात अवघे तीन रुग्ण; ग्रामीणमधील रुग्णही घटले

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, मोहोळ, माढा, माळशिरस, अक्‍कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांमध्ये उसाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यातील शेतकरी उसाकडे वळल्याने महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, मंगळवेढा या तालुक्‍यांमध्येही उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. जिल्ह्यातील उसावर सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम पूर्ण करतील, अशी स्थिती असतानाही काही कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील उसाला पहिले प्राधान्य देतात. तत्पूर्वी, गाळपाच्या सुरवातील कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी करावा, असे साखर आयुक्‍तालयाचे आदेश आहेत. तरीही, आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी कुठे जाणार नाही, परंतु कार्यक्षेत्राबाहेरील शेतकरी आपल्याला जोडला जावा म्हणून कारखानदारांकडून आयुक्‍तालयाचे आदेश पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील माहिती घेऊन ठोस मार्ग काढणे अपेक्षित आहे. परंतु, अद्याप त्यावर ठोस मार्ग न निघाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

The sugarcane season
इंग्रजीचा पहिला पेपर कॉपीमुक्‍त! जिल्ह्यातील 927 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर

तीन टप्प्यात 'एफआरपी'चा करार
शेतकऱ्याच्या शेतातून ऊस तुटून कारखान्याला गेल्यानंतर 14 दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. तरीही, साखर कारखान्यांनी ऊस नियंत्रण अध्यादेशानुसार शेतकऱ्यांसोबत करारपत्र करून त्यांना तीन टप्प्यात एफआरपी दिली जात आहे. सरासरी 10 टक्‍के एफआरपी गृहीत धरून शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी, असे साखर आयुक्‍तालयाचे आदेश आहेत. मात्र, त्यानुसार अंमलबजावणी होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

The sugarcane season
महावितरण थांबेना; आता शेतकरीही भडकला

जिल्ह्यात आता सव्वादोन लाख हेक्‍टरवर ऊस
रब्बीचा जिल्हा असलेल्या सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या सुरु असलेल्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख 71 हजार हेक्‍टरवर ऊस असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. तर पुढील गाळप हंगामासाठी जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्‍टरवर उसाचे क्षेत्र राहील, असा अंदाज साखर आयुक्‍तालयाचा आहे. बहुतेक साखर कारखाने सुरवातीला कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळपासाठी आणत असल्याने सध्या सोलापूर जिल्ह्यात अतिरिक्‍त उसाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()