Gadchiroli : उत्तर गडचिरोलीतून नक्षलींचे अस्तित्व समाप्त;पोलिस अधीक्षकः ८६ लाखांचे बक्षीस असलेले १२ नक्षलवादी ठार

‘‘गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (ता.१७) १२ नक्षलवाद्यांचा खातमा केल्याने कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर या दोन्ही दलमचे सर्व वरिष्ठ नक्षली मारले गेले आहेत. त्यामुळे उत्तर गडचिरोलीतून नलक्षवादी चळवळ पूर्ण समाप्त झाली आहे,’’
Gadchiroli
Gadchiroli sakal
Updated on

गडचिरोली : ‘‘गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (ता.१७) १२ नक्षलवाद्यांचा खातमा केल्याने कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर या दोन्ही दलमचे सर्व वरिष्ठ नक्षली मारले गेले आहेत. त्यामुळे उत्तर गडचिरोलीतून नलक्षवादी चळवळ पूर्ण समाप्त झाली आहे,’’ असे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

नीलोत्पल म्हणाले, ‘‘आगामी नक्षलवाद सप्ताहाच्या (२८ जुलै ते ३ ऑगस्ट) पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने कोरची-टिपागड व चातगाव-कसनसूर दलमचे १२ ते १५ नक्षलवादी छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीवरून पोलिस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाची सात पथके या जंगल परिसरात रवाना करण्यात आली. मोहीम राबवीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध घेतला असता सात पुरुष आणि पाच महिला नक्षलवादी मृतावस्थेत आढळले.’’ या सर्वांची ओळख पटली आहे. संपूर्ण कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलमचे अस्तित्व या मोहिमेमध्ये पुसले आहे. त्यामुळे उत्तर गडचिरोलीचा भाग नक्षलवाद्याच्या प्रभावातून मुक्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख आदी उपस्थित होते.

यांचा झाला खातमा

योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय, विशाल कुल्ले आत्राम ऊर्फ लक्ष्मण ऊर्फ सरदू, प्रमोद लालसाय कचलामी ऊर्फ दलपट, महारू धोबी गावडे, अनिल देवसाय दर्रो ऊर्फ देवा ऊर्फ देवारी, विज्जू, सरीता जारा परसा ऊर्फ मीना ऊर्फ रामे, रज्जो मंगलसिंग गावडे ऊर्फ समिता ऊर्फ सिरोंती, रोजा, सागर, चंदा पोड, सीता हवके हे नक्षलवादी या चकमकीत मारले गेले. त्यांच्यावर ८६ लाख रुपयांचे बक्षीस होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.