मंत्रिमंडळाचा विस्तार १९ तारखेला?; भाजपकडून दोघांचे नाव आघाडीवर

Maharashtra Cabinet Expansion Marathi News
Maharashtra Cabinet Expansion Marathi NewsMaharashtra Cabinet Expansion Marathi News
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर ३० जून रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. मात्र, दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे (Cabinet Expansion) लक्ष लागले असताना १९ जुलैला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. (Maharashtra Cabinet Expansion Marathi News)

पहिल्या टप्प्यातील शपथविधी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. यासाठी शिंदे गट व भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्हीकडून चार ते पाच मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

Maharashtra Cabinet Expansion Marathi News
हे सरकारच घटनाबाह्य व बेकायदेशीर - संजय राऊत

गुरुवारी कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सांगितले होते. मागच्या सरकारला दीड महिना पूर्ण झाल्यानंतरही फक्त सात लोकांचाच शपथविधी झाला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली होती.

बंडखोर आमदारांबाबत सुप्रीम कोर्टातून निर्णय आलेला नाही. आमदारांबाबत घाईने निर्णय देता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने ११ जुलै रोजी सांगितले होते. बंडखोर आमदारांवर काय निर्णय येणार याकडे लक्ष असल्याने अध्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टातूनही निर्णय यायला उशीर होणार असल्याने कमीत कमी मंत्र्यांचा शपथविधी पार पाडण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात आहे.

Maharashtra Cabinet Expansion Marathi News
द्रौपदी मुर्मूंचा विरोध योग्य नाही; काँग्रेस नेत्याचा पक्षाला सल्ला

मंत्र्यांचा शपधविधी झाला तर तो घटनाबाहेर असेल

मंत्र्यांचा शपधविधी झाला तर तो घटनाबाहेर असेल, असे खासदार संजय राऊत म्हणाले. आज दोघांचीच मंत्रिमंडळाची बैठक झाली, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. विरोधासाठी विरोध अशा भूमिकेत सरकारचे काम सुरू आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता असताना दोघांना शपथ कशी देण्यात आली, हे विचार करण्यासारखे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाला १३ मंत्रीपद!

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या (BJP) नजरा ओबीसी व्होट बँकेवर लागल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि विभागांचे विभाजन निश्चित करण्यात आले. शिंदे गटाला १३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. बाकीचे भाजपला मिळतील.

५३ आमदारांना नोटिसा

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. अशात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटातील ३९ आणि ठाकरे कॅम्पमधील १४ आमदारांना (MLA) नोटिसा मिळाल्या आहेत. या ५३ आमदारांना आठवडाभरात उत्तर मागितले आहे. या निर्णयाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.