Janta Raja Mahanatya : प्रत्येक जिल्ह्यात आता ‘जाणता राजा’चे प्रयोग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी ‘जाणता राजा’च्या प्रयोगांचे आयोजन केले जाणार आहे.
Janta Raja Mahanatya
Janta Raja Mahanatyasakal
Updated on

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात आता छत्रपती शिवरायांवरील ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी ३९ कोटींचा निधी मंजूर केला असून, तसा शासन निर्णयदेखील शनिवारी जारी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी ‘जाणता राजा’च्या प्रयोगांचे आयोजन केले जाणार आहे. ६ जून २०२४ पर्यंत या महानाट्याचे प्रत्येक जिल्ह्यात सलग तीन दिवस तीन प्रयोग होणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील खुल्या मैदानात या महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन करण्याबाबत निर्देश संबंधितांना देण्यात आले असून, राजशिष्टाचारानुसार, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवरांना निमंत्रित करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह १५ मान्यवरांची जिल्हानिहाय समिती गठित केली जाणार आहे.

त्याचबरोबर, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यासाठी ७३ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या एकूण निधीतील प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन कोटींचा निधी हा महोत्सवाच्या आयोजनासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

संस्कृतीचे आदानप्रदान हा मुख्य उद्देश

राज्यातील विविध ठिकाणच्या संस्कृतीचे आदानप्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच, स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात वीरांची माहिती यांचे प्रदर्शन या ‘महासंस्कृती महोत्सवा’मध्ये करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.