मुंबई : राज्यातील कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस कमी होणारी रूग्णसंख्या लक्षात घेता उद्यापासून (दि.2) महाराष्ट्रात मास्क घालणे ऐच्छिक करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर आता यावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने कोविड-19 सर्व निर्बंध शिथिल करत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची अनिवार्यता शिथिल केली आहे. परंतु, रोगाचा प्रसार रोखण्यात मास्क महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे अतिशय महत्वाचे असल्याचे मत ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (ICMR-NIV) संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी व्यक्त केले आहे. (Experts On Relation on Mask Free )
डॉ. अब्राहम म्हणाल्या की, 'सावधगिरीमध्ये सूट देण्याची ही ही योग्य वेळ आहे असे वाटत नाही. तसेच, गर्दीच्या ठिकाणी जेथे आपण एकमेकांच्या अगदी जवळ असतो अशा ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात, असेदेखील अब्राहम यांनी स्पष्ट केले. कोविड -19 साथीचा उद्रेक कमी झाला आहे परंतु तरीही आपल्याला सतर्क राहण्याची गरज असून, यावेळी निष्काळजी राहणे खूप धोकादायक ठरू शकते. (Covid Restriction Relax In Maharashtra )
नागरिकांनी स्वेच्छेने मास्क घालावेत : तज्ज्ञ
कोरोना (Corona Cases In India) साथीच्या रूग्णांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे SARS-CoV2 चा प्रसार रोखण्यासाठी यापुढे मास्कची गरज नाही. मात्र, क्षयरोग, फ्लू आणि श्वसन रोगांना कारणीभूत असलेल्या इतर सूक्ष्मजीवांचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना स्वेच्छेने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यास प्रोत्साहित केले पाहिजे असे मत प्रख्यात विषाणूशास्त्रज्ञ टी जेकब जॉन यांनी व्यक्त केले आहे.
चीनमध्ये परिस्थिती गंभीर
सध्या भारतात कोरोना रुग्णांमध्ये घट नोंदवली जात असून, शुक्रवारी भारतात केवळ 1355 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी शेजारील राष्ट्र चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. त्यामुळे चीनने शांघायमध्ये कडक लॉकडाऊन लागू केले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर लोकांची कोरोना तपासणीही केली जात आहे. चीनमध्ये कोरोनामुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा मोठे संकट कोसळले आहे. (Corona In China )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.