Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...
Updated on

मुंबईः महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातल्याप्रकरणी वादंग उठलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातला होता. त्यानंतर आता पटेलांचं स्पष्टीकरण आलेलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी 'एक्स' अकाऊंटवरुन पोस्ट करत म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. महाराजांचा अवमान होईल, अशी कोणतीही गोष्ट आमच्या मनात येऊ शकत नाही.

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...
Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

प्रफुल्ल पटेल यांची पोस्ट

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.

प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांचा जिरेटोप घालून सत्कार करणे त्यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. हिंदू महासभेने देखील यावर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी यावरुन प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे. इतकी लाचारी कुठून आली. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर बसवणार का? असा सवाल दवे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.