Eye Infection: महाराष्ट्रात डोळ्याच्या साथीचे लाखाहून अधिक रुग्ण, प्रशासनाने काळजी घेण्याचे केले आवाहन

बुलढाण्यात आढळले सर्वाधिक रुग्ण, पुणे आणि जळगावमध्येही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Eyes Infection
Eyes Infectionesakal
Updated on

Eye Infection: सध्या महाराष्ट्राबरोबरचं देशातही डोळे येण्याची साथ झपाट्याने पसरत आहे.दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त डोळ्याच्या साथीचे बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात डोळ्याच्या साथीचे आतापर्यंत १ लाख,८७ हजार रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. सुत्रांकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. बुलढाणा जिल्ह्यापाठेपाठ जळगाव अमरावती आणि पुण्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने, वैद्यकीय विभाग आणि स्थानिक प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्वेक्षण करुन उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पुण्यातही डोळ्याच्या साथीचे रुग्ण वाढत आहेत. आळंदी भागात मागील काही दिवसांमध्ये ४०००पेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते.

Eyes Infection
Titwala Murder Case: पत्नीने पतीचा मृत्यू दारु पिल्याने झाल्याचा दिला जबाब. मात्र, पोस्टमार्टममधून भलतंच सत्य उघड

हवामानातील बदलामुळे संसर्गजन्य रोग जास्त पसरतात. डोळे येण हा देखील संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे डोळे आलेला व्यक्ती जर सार्वजनिक ठिकाणी फिरला, तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांना डोळे येण्याचा धोका उद्भवू शकतो. शाळेत, घरात किंवा गर्दीच्या ठिकाणी डोळे आलेली व्यक्ती अन्य लोकांच्या संपर्कात आल्यास त्यातून संसर्ग पसरतो. त्यामुळे अनेकांचे डोळे येतात. त्याचे साथीत रूपांतर होते. अशी साथ रोखण्यासाठी डोळे आलेल्या व्यक्तीनी बरे होईपर्यंत कोणाच्याही संपर्का जाऊ नये.

अनेक व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, पडसे अशा प्रकारची लक्षणे दिसतात तेव्हा त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेले असते अशा व्यक्तीना थोडा जरी संसर्ग झाला तरी त्यांचे डोळे येऊ शकतात. रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे अशांना डोळे येण्याचे प्रमाण कमी आहे.

Eyes Infection
Shayan Ali Ghar Wapsi : ISI च्या भीतीमुळे स्वीकारला हिंदू धर्म! पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरने केली 'घरवापसी'ची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.