ED Raid : फेअर प्ले ॲप गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’चे मुंबई, पुण्यात छापे

अवैधपणे आयपीएलचे प्रसारण केल्याबद्दल वयकॉम १८ च्या तक्रारीवरून अलीकडेच सायबर महाराष्ट्रने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा नोंदवला होता.
ed
edesakal
Updated on

मुंबई - देश-परदेशातील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या संशयावरून ‘फेअर प्ले’ॲपशी संबंधित मुंबई व पुणे येथील १९ ठिकाणांवर गुरुवारी (ता. १३) आठ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराशी निगडित कागदपत्रे हस्तगत केली. या व्यवहारांसाठी वापर झालेल्या सुमारे ४०० बँक खात्यांचे तपशील मिळाले असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती ईडीने दिली.

अवैधपणे आयपीएलचे प्रसारण केल्याबद्दल वयकॉम १८ च्या तक्रारीवरून अलीकडेच सायबर महाराष्ट्रने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा नोंदवला होता. या ॲपची जाहिरात केल्याबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतील काही तारे-तारकांचीही चौकशी सुरू होती. याच गुन्ह्याचा आधार घेत ईडीने प्रकरण नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. ईडी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या ॲपद्वारे क्रिकेट सामन्यांसोबत लोकसभा निवडणुकीवर ऑनलाईन बेटिंग सुरू होते.

ईडी अधिकाऱ्याने पुढे दिलेल्या माहितीनुसार फेअर प्ले ॲपने आपली जाहिरात करण्यासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना दुबई आणि अन्य देशांमध्ये करारबद्ध केले; मात्र त्याआधी या ॲपद्वारे सुरू असलेले गैरप्रकार किंवा आर्थिक गैरव्यवहारांची माहिती घेण्याची तसदी या कलाकारांनी घेतली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोगस खात्यांत रक्कम

फेअर प्ले ॲपने आयपीएल प्रसारण आणि ऑनलाईन बेटिंगच्या माध्यमातून कमावलेली कोट्यवधींची रक्कम शेकडो बोगस कंपन्यांच्या बँक खात्यांवरून गोळा केली आणि गैरव्यवहारात सहभागी असलेल्या काही औषध कंपन्यांमध्ये फिरवली. पुढे हीच रक्कम हाँगकाँग, चीन आणि दुबई येथील बोगस कंपन्यांमध्ये वळती केल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाल्याचे ईडी अधिकाऱ्याने सांगितले. या व्यवहारांमध्ये सहभागी असलेली सुमारे ४०० बँक खाती समोर आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.