Andheri RTO Scam: "RTO मधून तब्बल ७६ हजार बनावट ड्रायव्हिंग लायसन्स जारी"; वडेट्टीवारांचा सभागृहात गंभीर आरोप

दुचाकीची टेस्ट घेऊन क्रेन, बस सारख्या वाहनांची लायसन्स देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Vijay Wadettivar
Vijay Wadettivar

मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. परिवहन मंत्रालयाकडून अनेक सुधारणा करुनही आरटीओमध्ये होत असलेले फेरफार अद्यापही कमी झालेले नाहीत. त्यातच आता आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे. अंधेरी RTO नं गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्याआधारे सुमारे ७६ हजार बनावट ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत, असा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (Fake driving licenses issued by Andheri RTO Serious allegations by Vijay Wadettivar in Vidhan Sabha)

Vijay Wadettivar
Fraud PM Kisan App: सावधान! व्हॉट्सअॅपवर 'पीएम किसान ॲप'ची लिंक अन् शेतकऱ्यांचे सात लाख गायब

वडेट्टीवार यांनी सभागृहातच यासंदर्भातील संपूर्ण लेखाजोखा मांडला. त्यांनी म्हटलं की, अशी बनावट लायन्सस जारी केल्यानंच पुण्यात घडलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणं घडत आहेत. अर्जदार किंवा उमेदवाराची अनिवार्य ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स संबंधितांना दिलं जातं. याअनुषंगाने 'सारथी'च्या ऑनलाइन डेटाद्वारे १ लाख ४ हजार ड्रायव्हिंग लायसन्सची पडताळणी केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे.

सन २०२३-२४ मधील या १ लाख ४ हजार ड्रायव्हिंग लायसन्सपैकी ७६ हजार ३५४ लायसन्स अवैध वाहनांवर कथित ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्यानंतर जारी करण्यात आले होते. हे प्रमाण जवळपास ७५ टक्के आहे. दुचाकी आणि कार अशा केवळ चार वाहनांचा वारंवार वापर स्कूटरपासून क्रेनपर्यंत विविध श्रेणींच्या वाहनांसाठी ही ७६ हजार ३५४ ड्रायव्हिंग लायसन देण्यात आल्याचा पर्दाफाश ड्रायव्हिंग लायसन्सच्या डेटामुळे झाला. यासंबंधीचे तपशीलही उपलब्ध आहेत. दोन दुचाकींवर ४१ हजार ९३ ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, तर इतर ३५ हजार २६१ ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vijay Wadettivar
Sanjay Jha: संजय झा यांची जेडीयूच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती; बिहारमध्ये नव्या राजकारणाला सुरुवात

लाइट मोटार व्हेइकलसाठी (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करताना दुचाकी वाहनांवर (मोटारसायकल) टेस्ट घेण्यात आल्या होत्या. तर, लाइट मोटार व्हेइकलवर ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन मोटारसायकल तसेच स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले. याशिवाय, तीनचाकी वाहनांच्या श्रेणीसाठी मोटार किंवा दुचाकी वाहनांवर ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन लायसन्स जारी करण्यात आले आहेत. LMV साठी परवाने जारी करण्यात आले होते परंतु वाहन चालविण्याच्या चाचण्या दुचाकी वाहनांवर घेण्यात आल्या होत्या, असाही खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

Vijay Wadettivar
Beed Audio Clip : धनंजय मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान; बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

मोटारसायकल/स्कूटर श्रेणीसाठी लायसन्स जारी करण्यात आले होते. परंतू LMVs वर ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तीनचाकी वाहनांच्या श्रेणीसाठी डीएल जारी करण्यात आले होते परंतू मोटार किंवा दुचाकी वाहनांवर ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामुळं या सर्व चाचण्या घेतल्या गेल्या होत्या की नाही याबद्दल साशंकता निर्माण होते. ही प्रकरणं केवळ उदाहरण म्हणून आहेत.

ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यासाठी कागदपत्रांबाबत योग्य प्रक्रियांचं पालन तसेच, संबंधित आरटीओ इन्सपेक्टरकडून वाहन तपशीलांची पडताळणी कशा प्रकारे केली गेली नाही, हे यावरुन स्पष्ट होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणीही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettivar
Beed Audio Clip : धनंजय मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान; बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

माणसं मेली तरी आरटीओंना काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त पैसा द्या, तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. आम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. अशा पद्धतीने बेदरकारपणे या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे हे खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. तरी देखील या खात्यातल्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरत नाही. दलाल आणि एजंटांच्या विळख्यात हे खात अडकलं आहे. हे खातं मुख्यमंत्र्यांचंच आहे.

ठाण्यापासून जवळ असलेल्या अंधेरी येथील आरटीओ कार्यालत 125 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा आकडा एका कार्यालयातला आहे. अशी 53 कार्यालये आहेत. म्हणजे या 53 कार्यालयातील भ्रष्टाचाराच्य़ा आकड्यांची बेरीज हजारो कोटींच्या घरात जाईल. मुख्यमंत्र्यांवरील भार हलका करण्यासाठी हा उद्योग सुरू आहे काय? असा सवालही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com